agriculture news in Marathi hailstorm prediction in central Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मराठवाड्यातील नांदेड, जालना, तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मराठवाड्यातील नांदेड, जालना, तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.२९) कोकण,विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार वारे मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाचे ढग जमा होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी (ता. २८) दुपारनंतर जालना जिल्ह्यातील नळविहिरा (ता. जाफराबाद) येथे पावसाला सुरवात झाली होती. तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात गारपिटीसह आलेल्या पावसाने शिजविलेल्या हळदीचे नुकसान झाले.

विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या मोर्शीतही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावली. मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचे ढग जमा झाले होते. तर मध्य महाराष्ट्र, आणि कोकणात आकाश अंशत: ढगाळ होते. राज्याच्या तापमानातही चढ-उतार सुरूच असून, मंगळवारी (ता.२८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, धुळे, सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वाशीम येथे तापमान ४० अंशांच्या पुढे असून, उर्वरित राज्यात पारा चाळीशी खाली घसरला आहे.

तापमानात काहीशी घट झाली असली तरी, उन्हाचा चटका कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा आहे. तर पुणे, नगर, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, विदर्भातील बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रूपर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.०, जळगाव ४१.४, धुळे ४०.०, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर ३१.६, मालेगाव ३८.२, नाशिक ३६.४, निफाड ३६.८, सांगली ३८.२, सोलापूर ४१.१, डहाणू ३३.७, सांताक्रूझ ३३.६, रत्नागिरी ३५.२, औरंगाबाद ३८.४, परभणी ४१.२, अकोला ४२.६, अमरावती ३९.८, बुलडाणा ३८.३, ब्रह्मपुरी ४०.५, चंद्रपूर ४२.०, गोंदिया ३५.६, नागपूर ३९.२, वाशीम ४१.०, वर्धा ३९.४.

कमी दाबाचे क्षेत्र तयार होतेय
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाब क्षेत्रासाठी पोषक स्थिती होत असून, उद्यापर्यंत (ता.३०) दक्षिण अंदमान समुद्रात ही प्रणाली तयार होण्याचे संकेत आहेत. त्याच्या प्रभावामुळे अंदमान निकोबार बेटसमुह, म्यानमारमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात ३ मेपर्यंत ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे, उंच लाट उसळून, समुद्र खवळणार आहे. या काळात मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...