agriculture news in Marathi hailstorm prediction in central maharashtra and Marathwada Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात आज गारपीटीचा इशारा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.१९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे.

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.१९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर तापमानातील वाढीमुळे उन्हाच्या झळाही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शनिवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भसह मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात तापमान चाळीशी पार असून, पश्‍चिम महाराष्ट्रातही उन्हाचा चटका कायम आहे. कोकणात तापमान ३३ ते ३४ अंशाच्या आसपास आहे. धुळे, जळगाव, परभणी, अमरावती, ब्रह्मपुरी, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथेही तापमान ४२ अंशांच्या पुढे असल्यान उन्हाचा चटका असह्य होत आहे. कमाल तापमान व उकाड्यात झालेली वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. 

उत्तर झारखंडपासून छत्तीसगड, विदर्भ, दक्षिण कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात दुपारनंतर वळीव स्वरुपाचा पाऊस पडत आहे. उद्यापर्यंत (ता.२०) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. कोकणात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, जळगाव ४३.०, धुळे ४२.०, कोल्हापूर ३५.२, महाबळेश्‍वर ३१.६, मालेगाव ४१.६, नाशिक ३८.१, निफाड ३८.२, सांगली ३७.०, सातारा ३९.१, सोलापूर ४०.९, डहाणू ३३.८, सांताक्रूझ ३४.२, रत्नागिरी ३३.०, औरंगाबाद ४०.८, परभणी ४२.७, अकोला ४३.८, अमरावती ४२.०, बुलडाणा ३९.६, ब्रह्मपुरी ४२.४, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४१.६, नागपूर ४३.४, वाशीम ४२.६, वर्धा ४२.९. 


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...