agriculture news in Marathi hailstorm prediction in state from tomorrow Maharashtra | Agrowon

राज्यात उद्यापासून गारपिटीचा इशारा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 मार्च 2020

गालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. उद्यापासून (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या अनेक भागांत जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा, तर कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूर्वमोसमी पाऊस थांबला आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र आकाश असल्याने राज्याच्या तापमानात चांगलीच वाढ होऊन उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर येथे तापमानाचा पारा छत्तिशी पार गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. 

बंगालच्या उपसागरात केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पूर्व आणि मध्य भारतात सातत्याने बाष्पाचा पुरवठा होत आहे. पश्चिम विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टाही कायम आहे. यामुळे उद्यापासून (ता. २४) पावसाला पोषक हवामान होऊन वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (१७.६), जळगाव ३५.० (२०.४), कोल्हापूर ३६.१ (२१.१), महाबळेश्‍वर ३१.० (१७.८), मालेगाव ३५.२ (१९.२), नाशिक ३३.१ (१७.०), निफाड ३०.० (१३.२), सांगली ३६.८ (१९.६), सातारा ३६.० (१८.३), सोलापूर ३७.२ (२०.३), अलिबाग २९.२ (२१.८), डहाणू ३१.३ (२२.४), सांताक्रूझ ३०.६ (२०.७), रत्नागिरी ३२.० (२१.२), औरंगाबाद ३४.४ (१९.९), परभणी ३६.० (१९.०), नांदेड ३७.०, अकोला ३६.९ (१८.१), अमरावती ३६.२ (१८.०), बुलडाणा ३३.५ (२१.२), चंद्रपूर ३६.५ (२०.५), गोंदिया ३१.२ (१९.२), नागपूर ३४.६(१६.२), वर्धा ३५.५ (१९.८). 
 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...