विदर्भात गारपिटीचा इशारा

hailstorm possibility
hailstorm possibility

पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.   अरबी समुद्र आणि आसामच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे हवामान काही अंशी ढगाळ आहे. काही भागात हवामान कोरडे असल्याने किंचित थंडी आहे. किमान तापमानात चढउतार आहे. विदर्भात काही भागांत थंडी कायम आहे. मंगळवारी (ता. ७) सकाळी अमरावती येथे १०.१अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने असल्याने राज्यात थंडी कायम आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान आणि कमी अधिक प्रमाणात थंडी आहे. आज (ता. ८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. उद्या (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा वगळता विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागांत ढगाळ हवामानामुळे थंडी अधिक स्वरूपात असून किमान तापमानात चढउतार सुरू आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. वाशीम, वर्धा, नागपूर, गोंदिया, अकोला, ब्रम्हपुरी या भागांत चांगलीच थंडी कमी झाली आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या वर होता. मराठवाड्यातही थंडी कमी झाली आहे. औरंगाबाद, परभणी, नांदेड या भागांत किमान तापमानाचा पारा १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. कोकणातही थंडी कमी झाली असून काही ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढले होते. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असल्याने किंचित थंडी होती. तरी काही भागांत ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झालेली होती. नाशिक, जळगाव, महाबळेश्वर, पुणे, मालेगाव या भागांत तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. उर्वरित सातारा, सांगली, सोलापूर या भागांत १६ ते १८ अंश सेल्सिअस तापमान होते. मंगळवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई २०.४, सांताक्रुझ १९.६, अलिबाग २०.३, रत्नागिरी २३.१, पुणे १४.४, नगर १४.५, अकोला १४.१, औरंगाबाद १३.७, नांदेड १३.०, जळगाव १५.०,  कोल्हापूर २०.०, महाबळेश्वर १४.६, नागपूर ११.५, नाशिक १४.०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com