agriculture news in Marathi hailstorm prediction in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात गारपिटीचा इशारा; मराठवाड्यातही पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 मार्च 2020

पुणे : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे. आज (ता. १६) विदर्भातही सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून (ता. १७) पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. तर अंशतः ढगाळ हवामान होऊन उकाडाही जाणवू लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटे गारठा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढल्याने धुळे, निफाड येथे तापमान १० अंशांखाली घसरले आहे.

पुणे : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे. आज (ता. १६) विदर्भातही सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून (ता. १७) पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. तर अंशतः ढगाळ हवामान होऊन उकाडाही जाणवू लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटे गारठा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढल्याने धुळे, निफाड येथे तापमान १० अंशांखाली घसरले आहे.

तर राज्यात दुपारी उन्हाचा चटका वाढत असल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील तफावत वाढलेली आहे. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.१ अंश तर सोलापूर येथे उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राज्यात पूर्वमोसमी पाऊस हंगामाला सुरवात झाली असून, विदर्भात रविवारी दुपारनंतर ढगाळ हवामान झाले होते. आजपासून (ता. १६) विदर्भातील अनेक ठिकाणी तर मराठवाड्यातील नांदेड व लगतच्या जिल्ह्यात जोरदार वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. १७) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. 

रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.१(१४.५), नगर ३४.४, धुळे ३१.० (९.८), जळगाव ३३.० (१५.२), कोल्हापूर ३४.५ (२०.४), महाबळेश्‍वर ३०.५ (१६.८), मालेगाव ३०.८ (१३.६), नाशिक ३१.१(१२.६), निफाड ३०.० (८.१), सांगली ३५.० (१९.४), सातारा ३३.६ (१७.४), सोलापूर ३६.२ (२१.९), अलिबाग ३०.२, डहाणू ३०.६ (१९.०), सांताक्रूझ ३४.३(१७.४), रत्नागिरी ३३.० (१९.६), औरंगाबाद ३२.९ (१६.८), परभणी ३४.८ (१७.४), नांदेड ३५.५ (२१.०), अकोला ३५.२(१५.८), अमरावती ३५.२(१७.४), बुलडाणा ३०.५(१६.८), चंद्रपूर ३४.०(१९.५), गोंदिया २९.४ (१८.२), नागपूर ३२.६ (१५.८), वर्धा ३४.४(१९.६). 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...