agriculture news in Marathi hailstorm prediction in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात आज गारपीटीचा इशारा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

आज (ता. २८) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वारे, मेघगर्जना, विजा, गारपीटीसह पाऊस पडत आहे. आज (ता. २८) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होत, हंगामात प्रथमच पारा ४० अंशांच्या वर गेला. अनेक ठिकाणी तापमान ३८ अंशाच्या पुढे गेले होते. मात्र पावसाळी वातावरण व ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.

अकोला येथे तापमान ३४.२ अंशांपर्यंत खाली आले आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, चंद्रपूर येथे प्रत्येकी ३७.५, तर मालेगाव येथे ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरीत राज्यात तापमान ३६ अंशांच्या खाली आहे. 

गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अरबी समुद्रातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता.२८) राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता.२९) व सोमवारी (ता.३०) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा आहे. तर कोकणातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने विर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (२१.९), जळगाव ३६.० (२२.२), कोल्हापूर ३५.६ (२३.५), महाबळेश्‍वर २८.४ (१८.४), मालेगाव ३७.० (२१.०), नाशिक ३४.६ (२१.३), निफाड ३७.५ (१९.४), सांगली ३५.४(२३.६), सातारा ३५.६ (२३.५), सोलापूर ३८.५ (२३.८), अलिबाग ३३.१, डहाणू ३४.० (२४.६), सांताक्रूझ ३५.९ (२५.१), रत्नागिरी ३३.२ (२५.६), औरंगाबाद ३२.३ (२१.९), परभणी ३६.१ (२१.१),अकोला ३४.२(२२.३), अमरावती ३१.० (२२.६), बुलडाणा ३३.० (२२.६), चंद्रपूर ३७.५ (२०.५), गोंदिया २९.२ (२०.८), नागपूर ३२.१ (२०.८), वर्धा ३२.० (२२.०). 


इतर अॅग्रो विशेष
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...
‘निसर्ग’चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
अल्पमुदतीच्या कृषिकर्ज फेडीस...नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या...
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये...नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे...
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’...पुणे  : अरबी समुद्रात महाराष्ट्र,...
देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून...
पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मॉन्सूनची...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
केरळचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापलापुणे  : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना...
टोळधाड नियंत्रणासाठी हेलिकॉप्टर अन्...नागपूर ः विदर्भात अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून...
निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध...नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...