agriculture news in Marathi hailstorm in Satana taluka Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सटाणा तालुक्यात गारपिटीचा दणका 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 मार्च 2021

गेल्या पाच दिवसांपासून अवकाळीचे संकट जिल्ह्यावर घोंघावत आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे.

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून अवकाळीचे संकट जिल्ह्यावर घोंघावत आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. प्रामुख्याने सटाणा तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात गारपिटीमुळे नुकसान अधिक आहे. आभाळ कोसळावे याप्रमाणे मंगळवारी (ता. २३) येथील केरसाने गाव व परिसरात झालेल्या गारपिटीमुळे उभे असलेले शेतकऱ्यांचे पीक काही क्षणातच मातीमोल झाले. 

सटाणा तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात सलग चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी कायम आहे. त्यात सलग दोन दिवस गारपीट झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः अडचणीत सापडला आहे. मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजेदरम्यान या भागातील केरसाने, तळवाडे दिगर, किकवारी, दसाने, विरगाव, पिंगळवाडे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. 

पश्‍चिम भागात रविवारी (ता. २१) तळवाडे दिगर येथे गारपिटीचा तडाखा झाल्यानंतर मंगळवारी (ता. २३) सायंकाळी केरसाने येथे सर्वाधिक गारपीट झाली. त्यामुळे या गावात रस्त्यांसह शेतावर गारांचा खच साचला होता. या भागात प्रामुख्याने उन्हाळ कांदा लागवडी आहेत. सध्या हे पीक काढणीच्या, तर काही ठिकाणी पोसण्याच्या अवस्थेत होते. मात्र गारपीट झाल्याने पात तुटून पडली, तर गारपिटीमुळे तयार होणाऱ्या कांद्याला मार लागल्याने, जखमा झाल्याने या भागात कांद्याचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले आहे. 

अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणीची लगबग सुरू होती. मात्र या गारपिटीत काढणीस आलेला कांदा भिजला. एकीकडे रोपवाटिकांचे नुकसान, बियाण्यांची टंचाई, वाढलेला लागवड खर्च या परिस्थितीत पदरमोड करून केलेल्या कांदा लागवडी गारपिटीमुळे पूर्णपणे नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत. त्यामुळे एका दिवसाच्या गारपिटीत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

मालेगाव तालुक्यात सौंदणे परिसरात झालेल्या पावसामुळे शेवगा लागवडी मोडून पडल्या आहेत. तर निफाड तालुक्यातील कोळगाव, कानळद, रुई, देवगावसह पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिक शहर व शहरालगत ग्रामीण परिसरात हलक्या सरी झाल्या. चांदवड तालुक्याच्या पश्‍चिम भागात पाच मिनिटे रिमझिम पाऊस सायंकाळी पडला. 

नुकसान असे 

  • कांदा, टोमॅटो, काकडी पिकाचे नुकसान 
  • गहू, हरभरा पिकांना फटका 
  • द्राक्ष बागांच्या खरड छाटण्या झाल्यानंतर नवीन फुटवा तुटून पडला, नवीन काड्या पूर्ण बाधित 
  • अनेक भागांत भाजीपाला पिकेही उद्ध्वस्त 
  • वाऱ्यामुळे शेवगा झाडे उन्मळून पडली. 

इतर अॅग्रो विशेष
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...