agriculture news in marathi Hailstrom alert in state | Agrowon

राज्यात आज गारपिटीचा इशारा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, धुळीचे वावटळी उठून गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानातही मोठी वाढ झाल्याने चटका असह्य होत आहे. मंगळवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे हंगामातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. दुपारनंतर ढग दाटून येत काही ठिकाणी जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

गेल्या काही दिवसापासून उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. सोलापूरसह, जळगाव, मालेगाव, सांगली, परभणी, अकोला, अमरावती येथे तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. तर बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे असल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पावसाला पोषक हवामान असल्याने मंगळवारी (ता.२४) दुपारनंतर ढग गोळा होण्यास सुरवात झाली. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून आले. 

मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.८ (१९.३), जळगाव ३८.० (२२.२), कोल्हापूर ३७.१ (२२.३), महाबळेश्‍वर ३२.५ (१९.३), मालेगाव ३८.०, नाशिक ३६.४ (२०.४), निफाड ३५.५ (१६.४), सांगली ३८.४ (२२.२), सातारा ३७.४ (२१.१), सोलापूर ३९.२ (२६.३), अलिबाग ३६.८ (२३.५), डहाणू ३२.४ (२३.०), सांताक्रूझ ३४.३ (२३.४), रत्नागिरी ३२.८ (२३.५), औरंगाबाद ३६.५ (२०.५), परभणी ३८.३ (२१.७), अकोला ३८.७ (२१.१), अमरावती ३८.० (२३.०), बुलडाणा ३५.० (२२.६), चंद्रपूर ३७.८ (१९.५), गोंदिया ३४.२ (२०.२), नागपूर ३६.८ (१८.५), वर्धा ३७.० (२२.०).

 


इतर अॅग्रो विशेष
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून...पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे...
भारत-चीन तणावाचा कापूस निर्यातीला फटकाजळगाव ः जगभरात वस्त्रोद्योगाची चाके फिरण्यास...
खानदेशात कापूस खरेदीला ‘ब्रेक’जळगाव ः शासकीय कापूस खरेदीला खानदेशात मागील...
बोगस बियाणे प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा...पुणे ः सोयाबीनच्या बोगस बियाणेप्रकरणी मुख्यमंत्री...
लॉकडाउनमध्ये १४ लाख क्विंटल फळ,...लातूर ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू...
राज्यात ठिबक अनुदानासाठी १९१ कोटी रुपये...सोलापूर : राज्यात यंदा दोन लाख १३ हजार ७५५...
पीककर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रारसोलापूर : पीककर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न...
जिल्हा बॅंकांनी ठोठावला राज्य बॅंकेचा...सोलापूर : ‘कोरोना’मुळे अडचणीत सापडलेल्या...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
सांगली जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुटचे क्षेत्र...सांगली  : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणारपुणे  : राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक...
जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
मराठवाड्यात पीककर्ज पुरवठ्याचं घोडं...औरंगाबाद  : कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना कर्ज...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
बा, विठ्ठला.. देशाला कोरोनामुक्त आणि...पंढरपूर, जि. सोलापूर : महाराष्ट्रासह अवघ्या...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
मराठवाड्यात जोरदार पावसामुळे काही...औरंगाबाद : मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस...