agriculture news in marathi, hailstrom warning for vidharbha | Agrowon

विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात आजपासून पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून, त्यांनतर किमान तापमानात घट होऊन थंडी पुन्हा वाढणार आहे. 

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून, त्यांनतर किमान तापमानात घट होऊन थंडी पुन्हा वाढणार आहे. 

पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्लीसह परिसरात पाऊस पडला असून, तुरळक ठिकाणी गारपीटही झाली अाहे. वायव्य राजस्थानपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय अाहे. पश्‍चिमी चक्रवात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये परस्पर विरोधी क्रिया होणार आहे. यातच उत्तर भारतात असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये आज आणि उद्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात रविवारपर्यंत (ता. २७) पावसाची शक्यता आहे. तर उत्तर कर्नाटक, तेलंगणा, अांध्र प्रदेशच्या किनारपट्टीय भागात रविवारी हलक्या पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आहे. पाऊस थांबल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली अाहे. 

बुधवारी (ता. २३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.९ (-०.२), जळगाव १३.० (०.८), कोल्हापूर १५.८ (०.५), महाबळेश्‍वर ११.४ (-२.३), मालेगाव १३.४ (२.७), नाशिक १२.८, सांगली १२.८ (-१.५), सातारा १०.१ (-२.६), सोलापूर १५.७ (-०.८), सांताक्रूझ १९.२ (२.४), अलिबाग १८.८ (१.६), रत्नागिरी १७.९ (-०.७), डहाणू १८.८ (१.८), आैरंगाबाद ११.८ (-०.६), परभणी १४.५ (-०.२), नांदेड १४.० (०.१), अकोला १५.० (०.७), अमरावती १३.० (-१.९), बुलडाणा १२.४ (-२.५), चंद्रपूर १२.८ (-२.७), गोंदिया १४.० (०.५), नागपूर १३.६ (-०.२), वर्धा १४.९ (०.८), यवतमाळ १६.० (०.४).

इतर अॅग्रो विशेष
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...
आबासाहेब झाले ग्लॅडिओलस पिकातील मास्टरअभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम...
दूध पावडर निर्यात अनुदान नाकारल्याने...पुणे : निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन...
उर्वरित विमा रक्‍कम द्या देण्याचे...जामखेड, जि. जालना  : विमासंरक्षित रकमेनुसार...
सरपंच, उपसरपंचांचे  मानधन आता ऑनलाइन पुणे : राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन...
राजापुरात भातावर लष्करी अळीरत्नागिरी : राजापूर तालुक्यात परिपक्व झालेल्या...
मॉन्सून आज घेणार महाराष्ट्राचा निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची...सोलापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह २५...
‘ऑक्टोबर हीट’ने महाराष्ट्र तापला पुणे : पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हीट’...
फळबागा, मिश्रपिके, सिंचनासह शेती केली...मौजे रेवगाव (ता. जि. जालना) येथील अनिल व विनोद या...