एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपाला सुरवात 

एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी  बेमुदत संपाला सुरवात 
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी  बेमुदत संपाला सुरवात 

नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळूर येथे झालेली बोलणी फिसकटल्याने नाशिकसह देशातील नऊ विभागांतील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवार (ता. १४) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. नाशिक विभागातील सुमारे ३५०० आणि देशभरातील एकूण ९ प्रभागातील जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसंदर्भात अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहे. मात्र, कंपनीने समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियन समितीच्या वतीने कामगारांनी बेमुदत संपाला सुरवात केली. सोमवारी (ता. १४) कामगारांनी एचएएलच्या मुख्य प्रवेशद्वारासह कारखान्यात जाणाऱ्या तीनही मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र जमून आंदोलनाला सुरवात केली. या वेळी कामगारांनी व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. व्यवस्थापन कामगार वर्गाची पिळवणूक करत असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. गेली ३४ महिने अधिकारी वर्ग वाढीव पगारवाढीचा लाभ घेत असून फक्त कामगारांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्याचे काम एचएएल वरिष्ठ व्यवस्थापन करत आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.  दरम्यान, अधिकारी वर्गाला ३५% इतकी वाढ दिलेली असताना कामगार वर्गाला तुटपुंजा पगार दिला असल्याचा आरोप करत व्यवस्थापनाच्या विरोधात कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. व्यवस्थापनाकडून कामगार वर्गाला दिल्या जाणाऱ्या अपमानकारक वागणुकीबद्दल तीव्र असंतोष, नाराजी असल्याचे पत्रकात म्हटले आहे. आस्थापनेप्रति कामगार प्रामाणिक असून, कंपनी जर आर्थिक संकटात असेल तर अधिकारीवर्गाला दिलेली वेतनवाढ रद्द करावी आणि आर्थिक स्थिती उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगारांची वेतनवाढ करावी, अशी भूमिका कमिटीच्या वतीने मांडण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com