मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल कामगारांच्या पाठीशी उभे राहणार : शरद पवार

मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल कामगारांच्या पाठीशी उभे राहणार
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल कामगारांच्या पाठीशी उभे राहणार

नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना नाशिककरांना एचएएलची भेट दिली. हा कारखाना म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वैभव होता. मात्र, आता एचएएलच्या कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. आघाडी सरकारने एचएएल मोठ्या प्रमाणात काम दिलं. मात्र, आता कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचसाठी कामगार वर्गाने जे आंदोलन छेडले आहे. पुढील काळात एचएएल कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांच्या पाठीशी उभे राहणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कामगारांना दिली.  एचएएल विमाननिर्मिती कारखान्यांतील देशभरातील नऊ विभागातील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवार (ता. १४) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यात नाशिक विभागातील सुमारे ३५०० कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसंदर्भात अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या बेमुदत बंद संपला शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १८) भेट देत संपावर गेलेल्या कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार दिलीप बनकर, यांसह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी श्री. पवार म्हणाले, राफेलच्या दर्जाबाबत शंका नाही, सुखोईचं काम ही सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. राफेल विमानांची निर्मिती करण्याची क्षमता असतानाही बनविण्याचे काम एचएएल का दिलं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यांना विमाननिर्मितीमधील काही माहीत नाही, ज्यांनी कधी कागदाचंही विमान बनवलं नाही, अशांना केंद्रातर्फे राफेलच काम दिलं जात हे कितपत योग्य आहे ? असे त्यांनी ठणकावून सांगितले. एचएएल कामगारांना देऊ करण्यात आलेली वेतनवाढ पुरेशी नाही. कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. मात्र, केंद्राच्या धोरणामुळे कामगारांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे. निवडणुकांनंतर कामगार युनियन प्रतिनिधींसोबत आपण स्वतः मात्र दिल्लीत मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com