Agriculture news in marathi; HAL will stand behind workers to meet demands: Sharad Pawar | Page 2 ||| Agrowon

मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल कामगारांच्या पाठीशी उभे राहणार : शरद पवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना नाशिककरांना एचएएलची भेट दिली. हा कारखाना म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वैभव होता. मात्र, आता एचएएलच्या कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. आघाडी सरकारने एचएएल मोठ्या प्रमाणात काम दिलं. मात्र, आता कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचसाठी कामगार वर्गाने जे आंदोलन छेडले आहे. पुढील काळात एचएएल कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांच्या पाठीशी उभे राहणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कामगारांना दिली. 

नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना नाशिककरांना एचएएलची भेट दिली. हा कारखाना म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वैभव होता. मात्र, आता एचएएलच्या कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. आघाडी सरकारने एचएएल मोठ्या प्रमाणात काम दिलं. मात्र, आता कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचसाठी कामगार वर्गाने जे आंदोलन छेडले आहे. पुढील काळात एचएएल कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांच्या पाठीशी उभे राहणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कामगारांना दिली. 

एचएएल विमाननिर्मिती कारखान्यांतील देशभरातील नऊ विभागातील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवार (ता. १४) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यात नाशिक विभागातील सुमारे ३५०० कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसंदर्भात अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या बेमुदत बंद संपला शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १८) भेट देत संपावर गेलेल्या कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार दिलीप बनकर, यांसह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी श्री. पवार म्हणाले, राफेलच्या दर्जाबाबत शंका नाही, सुखोईचं काम ही सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. राफेल विमानांची निर्मिती करण्याची क्षमता असतानाही बनविण्याचे काम एचएएल का दिलं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यांना विमाननिर्मितीमधील काही माहीत नाही, ज्यांनी कधी कागदाचंही विमान बनवलं नाही, अशांना केंद्रातर्फे राफेलच काम दिलं जात हे कितपत योग्य आहे ? असे त्यांनी ठणकावून सांगितले. एचएएल कामगारांना देऊ करण्यात आलेली वेतनवाढ पुरेशी नाही. कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. मात्र, केंद्राच्या धोरणामुळे कामगारांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे. निवडणुकांनंतर कामगार युनियन प्रतिनिधींसोबत आपण स्वतः मात्र दिल्लीत मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना दिले.

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...