नागपूर विभागात निम्मे शेतकरी ‘सन्मान’पासून वंचित

निम्मे शेतकरी ‘सन्मान’पासून वंचित
निम्मे शेतकरी ‘सन्मान’पासून वंचित

नागपूर  : शेतकऱ्यांसाठी सन्मानासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेपासून नागपूर विभागातील जवळपास निम्मे शेतकरी वंचित राहिले आहेत. विभागातील ५८ टक्केच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात हा आकडा फक्‍त ५१ टक्केच असल्याची माहिती मिळाली. 

शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकारने सुरू केली. त्यानेअंतर्गत दोन हेक्‍टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यांत दोन हजार रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना सन्मान नाही, तर अपमान करणारी असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

नागपूर विभागात १६ लाख ५२ हजार ६४७ शेतकरी आहेत. यातील ११ लाख २८ हजार २८ शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी शेतजमीन आहे. विभागाकडून ६ लाख ९४ हजार ७९० शेतकरी शेतकऱ्यांना पात्र ठरविले आहे. विभागातील ६ लाख ५६ हजार ३७२ शेतकऱ्यांचे अर्ज एनआयसी या बेससाइटवर अपलोड करण्यात आले आहेत. 

जिल्हा एकूण शेतकरी अल्पभूधारक पात्र एनआयसीवर अपलोड टक्के
नागपूर ३४४१११ २१५९५० १३०१२९ १११८०७ ५१.७७
वर्धा २४८५९३ १२५३८७ ८९७९४  ८२३२८ ६५.६६
भंडारा २३२२१५ २२९६९७ ११७२५१ ११६८०८ ५०.८५
गोंदिया २६६९७९ १८७६०१ १३५६८२ १३५६८२ ७२.३३
चंद्रपूर ३६१७९१ २६०४६२ १४२०३६  १२९८६९ ४९.८६
गडचिरोली १९८९५ १०८९३१  ७९८९८  ७९८६२ ७३.३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com