निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच 

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई जेएनपिटी येथे निर्यातबंदी होण्यापूर्वी पास मिळवून निर्यात प्रक्रिया पूर्ण झालेल्या १५० च्या जवळपास कंटनेरला निर्यातीची परवानगी मिळाली.
onion
onion

नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई जेएनपिटी येथे निर्यातबंदी होण्यापूर्वी पास मिळवून निर्यात प्रक्रिया पूर्ण झालेल्या १५० च्या जवळपास कंटनेरला निर्यातीची परवानगी मिळाली. तरीही १४ सप्टेंबर रोजी पोहोचलेले १०० हुन अधिक कंटेनर बंदरावर अडकून पडले आहेत. त्यामुळे यावर निर्णय घेऊन ते निर्यातीसाठी सोडले जावेत, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. 

याबाबत कंदा निर्यातदार संघटनेने म्हटले आहे, की निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाला त्या दिवशी सोमवार (ता.१४) पासून दुपारनंतर कस्टमकडून नोंदणी व संबंधित कामे ठप्प झाली होती. मात्र याच दिवशी अनेक वाहने बंदरावर येत होती. त्यानंतर सायंकाळी निर्यातबंदीचा निर्णय झाला. मात्र निर्णय होण्यापूर्वी आमची वाहने निर्यात प्रक्रियेसाठी पोहोचली, किमान त्यांना जाऊ द्या, याबाबत केंद्राकडे खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी बंदरावर पास मिळालेले व लेटर ऑफ क्रेडिटसह शिपिंग प्रक्रिया पूर्ण झालेले कंटेनर सोडण्यात आले, मात्र १४ सप्टेंबर रोजी पोहोचलेले कंटेनर सोडण्याचा निर्णय झाला नाही. 

प्रमुख आयातदारांकडून मागणी नोंदवली गेल्याने व्यवहारातील पत टिकवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या एकीकडे असताना केंद्राने उभ्या असलेल्या मालाला जाऊ द्यावे, अशी मागणी निर्यातदार करत आहेत. मात्र केंद्राने निर्यातबंदी झाल्यानंतर माल जाऊ देण्याबाबत तारखेपर्यंत असा उल्लेख केल्याने गोंधळ झाला आहे. त्यामुळे निर्णय होण्यापूर्वी पोहोचलेल्या कंटेनरला जाण्यास अडचणी कायम आहेत. याबाबत निर्णय स्पष्ट झालेला नसल्याचे सांगण्यात आले.  कांदा खराब होण्याची शक्यता  अगोदरच काढणी दरम्यान झालेला पाऊस, तापमान व हवामानातील अधिक आर्द्रता यामुळे कांद्याची टिकवणक्षमता कमी आहेत. त्यातच आठ दिवसांतून अधिक दिवस होऊन कांदा अडकून पडल्याने खराब होऊन नुकसान वाढण्याची शक्यता आहे. नेमके यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com