अर्ध्यावर पावसाळा लोटला, मराठवाड्यातील पाणीसाठा गंभीर

अर्ध्यावर पावसाळा लोटला, मराठवाड्यातील पाणीसाठा गंभीर
अर्ध्यावर पावसाळा लोटला, मराठवाड्यातील पाणीसाठा गंभीर

औरंगाबाद : पावसाळ्याचा अर्धाअधिक कालावधी उलटून गेला. तरीही मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांमध्ये वाढच झाली नाही. तब्बल ३४५ लघू, मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे २६४ लघू, मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. सहा मोठ्या प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसुद्धा शिल्लक नसल्याची विदारक स्थिती आहे. 

मराठवाड्यातील कोरड्याठाक असलेल्या ३४५ प्रकल्पांत २८ मध्यम, तर ३१७ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. कोरड्याठाक २८ मध्यम प्रकल्पांत औरंगाबाद जिल्ह्यातील ५, जालनामधील १, बीडमधील ९ , लातूरमधील २, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल ११ प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे अजूनही पाण्याचा थेंब न साठलेल्या ३१७ लघू प्रकल्पांत औरंगाबादमधील ४०, जालनामधील ३७, बीडमधील ९४, लातूरमधील ३७, उस्मानाबादमधील १०९ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. 

मोठ्या प्रकल्पांचीही स्थिती फारशी समाधानकारक नाही. ११ मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ जायकवाडीत ८६ टक्‍के, निम्न मनारमध्ये ५८ टक्‍के, विष्णुपुरीत १०० टक्‍के, तर ऊर्ध्व पैनगंगामध्ये १५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. उर्वरित येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना आदी प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या २६४ प्रकल्पांत २९ मध्यम, तर २३५ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

या २९ मध्यम प्रकल्पात औरंगाबादमधील ७, जालन्यातील ४, बीडमधील ६, लातूर व उस्मानाबादमधील प्रत्येकी ५ व परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या २३५ लघू प्रकल्पांत औरंगाबादमधील २२, जालन्यातील १७, बीडमधील २२, लातूरमधील ३७, उस्मानाबादमधील ७८, नांदेडमधील २१, परभणीमधील १९ व हिंगोलीतील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे. तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यात पाण्याचा थेंब नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

पाणीसाठा स्थिती

प्रकल्प संख्या उपयुक्‍त पाणीसाठा (टक्के)
मोठे प्रकल्प ११  ४२.२१
मध्यम प्रकल्प ७५ ९.२६ 
लघू प्रकल्प ७४९ १०.०२
गोदावरी नदीवरील बंधारे १३ ५५.१० 
तेरणा, मांजरा, रेणा २४  ००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com