Agriculture news in Marathi Half of soybeans destroyed in Nagar district | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी, मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात सोयाबीनला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेले आहे.

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी, मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात सोयाबीनला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे काढणी करता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत भिजल्याने सोयाबीन शेंगांना कोंब फुटले आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे पन्नास ते साठ हजार हेक्टरवर क्षेत्राला फटका बसला आहे. 

नगर जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्ती म्हणजे १ लाख १७ हजार ८२२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. सरासरी ५४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र असताना यंदा सरासरीच्या २१७ टक्के पेरणी झाली. नगर, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सोयाबीनचे पीक जोमात होते. मात्र, ऐन काढणीच्या काळातच पावसाने सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत आहे. शेवगाव, पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्यांसह अन्य भागातही सतत जोरदार पाऊस झालेला असून एकापेक्षा अधिक वेळी अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. 

अनेक भागातील सोयाबीन शेतात पाणी साठवून राहिले आहे. शिवाय सततच्या पावसामुळे शेंगाला जागेवरच कोंब फुटले आहे. काही ठिकाणी सोयाबीन दाणे काळे पडले आहेत. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा पन्नास टक्केही उत्पादन हाती येण्याची शक्यता दिसत नाही. काही ठिकाणी तर पूर्णतः सोयाबीन वाया गेले आहे. जिल्हाभरात सुमारे पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले आहे. 

शेतकरी अतुल तांबे म्हणाले, ‘‘यंदा सततच्या पावसामुळे शेतात पाणी साठल्याने सोयाबीन काढणी करता येईना. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. सोयाबीनचा नफा नव्हे, झालेला खर्चही निघेल असे वाटत नाही.’’

कृषी विभाग बेफिकीर 
नगर जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, कापूस, कांदा, काही प्रमाणात बाजरी, मका, भाजीपाला पिकांचे सततचा पाऊस, अतिवृष्टी, पुराने मोठे नुकसान झाले आहे. खरे तर असा काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असते. मात्र, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बहुतांश ठिकाणी गेलेच नाहीत. केवळ रात्री उशिरापर्यंत बैठका घेण्याचा फार्स करताना आतापर्यंत नेमके कोणत्या भागात किती नुकसान झाले आहे, याबाबत साधी आकडेवारीही कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतीविषयक बाबीत कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीच बेफिकीर असल्याचे आतापर्यंत दिसून येत आहे.


इतर अॅग्रो विशेष
द्राक्ष बागाईतदार संघाने मांडल्या...नाशिक : द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात...
ऑक्टोबरमध्ये बाजारात आला ३१.१३ लाख गाठी...पुणे ः कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर...
फळबागांसाठी पॅकहाउस ठरले फायदेशीरआळंदी म्हातोबा येथील प्रकाश जवळकर यांनी फळबाग...
शेततळ्यांना मिळणार ५२ कोटींचे अनुदानपुणे ः राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या...
राज्यात पावसाची उघडीप शक्य पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
 हवामानाच्या अचूक अंदाजासाठी ...औरंगाबाद : येथे सी बँड रडार डॉपलर बसविण्यास...
ब्राझीलमध्ये सोयाबीनची ८६ टक्के पेरणी...पुणे ः यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने...
लाटलेला पैसा वसूल करण्याचे आदेशपुणे ः गट शेतीबाबत राज्य शासनाला दिशाभूल करणारी...
जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास...सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा...
विकास सोसायट्यांच्या निवडणुकीनंतरच ...पुणे ः राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी...
पीकविमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई...नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक...
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
सोयाबीनच्या दरामध्ये तेजीचा काळअकोला ः गेले काही दिवस दबावात असलेले सोयाबीनचे दर...
गट शेतीला दिलेल्या  अनुदानाचा गैरवापरपुणेः कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची...
तेलबियांच्या क्षेत्रात घटीचा कल कायमनगर ः एकेकाळी तेलबियांचे भरघोस उत्पादन घेण्याऱ्या...
शिराळ्यातील गुऱ्हाळ घरांना घरघर सांगली ः शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे दसरा आणि...
अवकाळीचा फळपिकांना मोठा तडाखामागील आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी...
कापूस दराला पुन्हा उभारीपुणे ः मागील काही दिवसांत अफवांमुळे कापूस बाजारात...