Agriculture news in Marathi Half of soybeans destroyed in Nagar district | Page 3 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी, मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात सोयाबीनला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेले आहे.

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी, मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात सोयाबीनला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे काढणी करता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत भिजल्याने सोयाबीन शेंगांना कोंब फुटले आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे पन्नास ते साठ हजार हेक्टरवर क्षेत्राला फटका बसला आहे. 

नगर जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्ती म्हणजे १ लाख १७ हजार ८२२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. सरासरी ५४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र असताना यंदा सरासरीच्या २१७ टक्के पेरणी झाली. नगर, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सोयाबीनचे पीक जोमात होते. मात्र, ऐन काढणीच्या काळातच पावसाने सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत आहे. शेवगाव, पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्यांसह अन्य भागातही सतत जोरदार पाऊस झालेला असून एकापेक्षा अधिक वेळी अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. 

अनेक भागातील सोयाबीन शेतात पाणी साठवून राहिले आहे. शिवाय सततच्या पावसामुळे शेंगाला जागेवरच कोंब फुटले आहे. काही ठिकाणी सोयाबीन दाणे काळे पडले आहेत. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा पन्नास टक्केही उत्पादन हाती येण्याची शक्यता दिसत नाही. काही ठिकाणी तर पूर्णतः सोयाबीन वाया गेले आहे. जिल्हाभरात सुमारे पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले आहे. 

शेतकरी अतुल तांबे म्हणाले, ‘‘यंदा सततच्या पावसामुळे शेतात पाणी साठल्याने सोयाबीन काढणी करता येईना. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. सोयाबीनचा नफा नव्हे, झालेला खर्चही निघेल असे वाटत नाही.’’

कृषी विभाग बेफिकीर 
नगर जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, कापूस, कांदा, काही प्रमाणात बाजरी, मका, भाजीपाला पिकांचे सततचा पाऊस, अतिवृष्टी, पुराने मोठे नुकसान झाले आहे. खरे तर असा काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असते. मात्र, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बहुतांश ठिकाणी गेलेच नाहीत. केवळ रात्री उशिरापर्यंत बैठका घेण्याचा फार्स करताना आतापर्यंत नेमके कोणत्या भागात किती नुकसान झाले आहे, याबाबत साधी आकडेवारीही कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतीविषयक बाबीत कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीच बेफिकीर असल्याचे आतापर्यंत दिसून येत आहे.


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...