agriculture news in marathi, Half of state covered by Monsoon | Agrowon

निम्मा महाराष्ट्र माॅन्सूनने व्यापला

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 जून 2018

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ९) जोरदार मुसंडी मारत निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सूनने बहुतांशी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अाणखी काही भागांमध्ये धडक देत, मुंबईसह ठाणे, नगर, परभणी, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला असून, उर्वरित भागातही ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली आहे.

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ९) जोरदार मुसंडी मारत निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सूनने बहुतांशी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अाणखी काही भागांमध्ये धडक देत, मुंबईसह ठाणे, नगर, परभणी, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला असून, उर्वरित भागातही ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली आहे.

मॉन्सूनने शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात एकाच वेळी प्रवेश करत महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी राज्याच्या आणखी काही भागापर्यंतचा टप्पा पूर्ण करताना कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह ठाणे जिल्‍ह्याचा बहुतांशी भाग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुण्यासह नगरचा काही भाग, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, हिंगोलीसह जालना जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याचा मोठा भाग व्यापला आहे.

तर छत्तीसगड, अोडिशा, वायव्य बंगालच्या उपसागरामध्येही शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने प्रगती केली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्याने सोमवारपर्यंत (ता. ११) छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत प्रगती शक्य अाहे. तर, बुधवारपर्यंत (ता. १३) झारखंड आणि बिहार राज्यात मॉन्सून पोचण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
बंगालच्या उपसागरात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने ओडिशा, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगालसह उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. ही प्रणाली पोषक ठरल्यास मॉन्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 


इतर अॅग्रो विशेष
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...