सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलन

सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलन
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलन

सांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी भौतिक सुविधा नसल्याने शुक्रवारी (ता. १४) अचानक काम बंद आंदोलन केले. समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. अचानक आंदोलनामुळे समितीतील कामकाज ठप्प झाले.

बाजार समितीच्या आवारात अनेक ठिकाणी बांधकामाचे परवाने न घेताच बांधकाम केले आहे, असा आरोप आंदोलनकांनी या वेळी केला. समितीतील अनेक बोळरस्ते बेकायदा विकण्यात आले आहेत, असेही विकास मगदूम यांनी सांगितले. बाजार समितीच्या आवारात एकच स्वच्छतागृह आहे. मात्र, तेही स्वच्छ नाही. तसेच हमालांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. 

गेल्या काही दिवसांपासून हमाल संघटनेत याविषयी असंतोष होता. आज अचानक त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कोल्हापूरसह काही जिल्ह्यांतून, तसेच कर्नाटकातील शेतमाल घेऊन आलेली वाहने माल न उतरवल्याने खोळंबून राहिली. व्यापाऱ्यांना सौदे करता आले नाहीत. 

हमालांनी समिती कार्यालयासमोर निदर्शने व घोषणाबाजी केली. सुमारे बाराशे हमाल बंदमध्ये सहभागी झाले. तसेच अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी हमाल, तोलाई प्रतिनिधी संचालन बाळासाहेब बंडगर यांनी केली आहे.

बाजार समितीने सर्वांसाठीच स्वच्छतागृहे खुले करावेत. जी स्वच्छतागृहे आहेत त्याची दररोज स्वच्छ करावीत. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे. त्या ठिकाणीची अतिक्रमणे काढावीत म्हणजे, वाहनांची गर्दी होणार नाही.  - विकास मगदूम, जनरल सेक्रेटरी, सांगली जिल्हा हमाल पंचायत

अतिक्रमणाचे बांधकाम बंद केले आहे. आवारात दुसरे स्वच्छतागृह बांधण्यात आले असून, ते लवकर सुरू होईल. - दिनकर पाटील, सभापती, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com