agriculture news in Marathi Hamal corona positive in Jalgaon Maharashtra | Agrowon

हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक रिकामे होईनात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या काही हमाल बांधवांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरात खतांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. 

जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या काही हमाल बांधवांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरात खतांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. दोन रेल्वे रेक हमाल बांधव न आल्याने रिकामे करता आले नाहीत. जिल्ह्यात खतांची प्रतीक्षा असून, प्रशासन ही समस्या हाताळण्यात अपयशी ठरले आहे. 

सध्या जिल्ह्यात भुसावळ, अमळनेर व जळगाव येथे लॉकडाउन सुरू आहे. हे लॉकडाउन आणखी येत्या सोमवापर्यंत  (ता.१३)आहे. अशातच या आठवड्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात १०.२६.२६, युरिया व इतर खते घेवून रेल्वेचे दोन रेक जळगाव येथील मालधक्क्यावर दाखल झाले.

परंतु जिल्ह्यात लॉकडाउन सुरू असल्याने आणि सुमारे १२ हमाल बांधव कोरोनाग्रस्त असल्याने हे रेल्वे रेक रिकामे करण्यासंबंधी कृषी विभाग व प्रशासनाने असमर्थता दाखविली. परिणामी रेक दोन दिवस उभेच राहिले. रेल्वेकडून जिल्हा प्रशासन, कृषी विभागाशी सतत संपर्क सुरू होता. परंतु रेक रिकामे झाले नाहीत. नंतर यातील एक रेक मलकापूर (जि.बुलडाणा) येथे पाठविण्यात आला. व दुसरा रेकही विदर्भात पाठविला. 

जिल्ह्यात पाचोरा व चाळीसगाव येथे रेल्वेचे मालधक्के उपलब्ध आहेत. जळगावात तूर्त हमाल व रेल्वे मालधक्का उपलब्ध करणे लॉकडाउनमुळे अशक्य आहे. यामुळे पाचोरा व चाळीसगाव येथील रेल्वे मालधक्क्यावर खते पोचवून तेथे रेल्वे रेक रिकामे करता येतील. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...