हमालांचा शुल्कवसुलीवरून बाजार समितीबरोबर वाद

Nashik APMC
Nashik APMC

नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन फळ, पालेभाज्या लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर व्यापाऱ्यांचा शेतीमाल लोखंडी गाडीवरून गाळ्यावर हमाल वाहून नेतात. मात्र हे काम करताना वाहतुकीस अडथळा येऊन गैरप्रकार घडतात. त्यावर पर्याय म्हणून हमालांकडून महिन्याला एक हजार रुपये प्रत्येक गाडीमागे शुल्क वसूल करण्याची तयारी बाजार समितीने केली आहे. हमालांचे गाडे नोंदणीकृत करून शिस्त लावण्याचा जरी प्रयत्न होत आहे, मात्र याला हमालांनी विरोध केला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या प्रयत्नांला हमालांचा विरोध असल्याचे दिसून येते.  बाजार समितीत शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांचा शेतीमाल हमाल लोखंडी लोटगाडीवरून वाहतूक करतात. हमालांकडून बाजार समितीत लोटगाड्या उभ्या केल्या जातात व शेतकऱ्यांनादेखील कधी गाड्या लोटायला लावले जाते. त्यामुळे अनधिकृत हमाली व्यवसाय करणाऱ्यांना शिस्त लागण्यासाठी बाजार समिती प्रत्येक गाडीमागे बाजार शुल्क वसूल करणार असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तर बाजारात हमाल शारीरिक कष्ट करून पैसे कमवीत असताना, त्यात बाजार समितीचा संबंध काय? असा सवाल हमालांनी केला आहे. बाजार समितीत हमालांच्या अनेक लोटगाड्या आहेत, परंतु या लोटगाड्यांची बाजार समितीत कागदोपत्री नोंद नाही. काही हमाल गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याकडून गुन्हेगारी घटना घडू शकतात. त्यामुळे हमालांनी लोटगाड्यांची अधिकृत नोंदणी केल्यास त्या गाड्यांना नोंदणी क्रमांक देता येईल. तसेच संबंधित हमालांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड जमा केले जाणार असून, लोटगाड्या रस्त्यात कुठेही उभ्या करून वाहतूक कोंडी होत असल्याने त्यांना शिस्त लावण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गाडीमागे महिना हजार रुपये शुल्क वसूल करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती सचिव अरुण काळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com