सांगली : हमाल, तोलाईदारांचा सोमवारपासून काम बंदचा निर्णय

हमाल, तोलाईदारांचा सोमवारपासून काम बंदचा निर्णय
हमाल, तोलाईदारांचा सोमवारपासून काम बंदचा निर्णय

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने माथाडी कामगारविरोधी धोरण अवलंबले जात आहे. माथाडी कायदा कमकुवत करून कामगारांची चळवळ मोडीत काढण्याच्या धोरणाविरुद्ध सांगलीतील सर्व क्षेत्रातील हमाल, महिला कामगार, तोलाईदारांनी सोमवार (ता. १५) पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 

सांगली जिल्हा हमाल पंचायत आणि सांगली जिल्हा तोलाईदार सभा यांची संयुक्त बैठक झाली. हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम, गोंविद सावंत, बाळासाहेब बंडगर, प्रल्हाद व्हनमाने, राजाराम बंडगर, बजरंग खुटाळे, संजय मोरे, श्रीमंत बंडगर, दिगंबर तुपलोंडे, विठ्ठल यमगर, विमल कदम, रेणुका वडर, सुवर्णा पांढरे, तोलाईदर सभेचे आदगोंडा गौंडाजे, यशंवत पवार, श्रीकांत पुस्तके आदींची उपस्थिती होती. 

मगदूम म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षांत माथाडी कायदा कमकुवत करण्यासाठी वेगवेगळे अध्यादेश काढले. राज्यातील अनेक माथाडी मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष, सचिव नेमलेले नाहीत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली नाही. त्यामुळे माथाडी कायद्याची अंमलबजावणी ठप्प आहे. छत्तीस माथाडी मंडळांच्या एकत्रीकरणचा प्रयत्न शासन करत आहे. काही क्षेत्रांतून माथाडी कायदा वगळण्याचे धोरण शासन आखत आहे.’’

‘‘हमाल माथाडी संघटनांनी कामगारांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सहकारी पतपेढ्या, सोसायट्या संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून हमाल माथाडी महिला कामगारांना सक्षम बनवले आहे. आता या सहकारी संस्था मोडीत काढण्यासाठी अध्यादेश काढला आहे. या आदेशाला स्थगिती द्यावी, यासाठी कामगार मंत्र्यांनी लेखी आदेश देऊनही कामगार विभागाने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आर्थिक सहाय्य मिळणे बंद झाले आहे. या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारपासून कामबंदचा निर्णय घेतला आहे,’’ असे मगदूम यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com