शेतीमालाच्या थेट विक्रीतून वाचली हमाली, तोलाई, अडत

शेतीमालाच्या थेट विक्रीतून वाचली हमाली, तोलाई, अडत
शेतीमालाच्या थेट विक्रीतून वाचली हमाली, तोलाई, अडत

पुणे ः पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘शेतकरी ते ग्राहक’ हा उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवारी (ता. ३१) पंढरपूर आणि बारामती भागातील शेतकऱ्यांनी या उपक्रमांतर्गत थेट फळभाज्यांची विक्री केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा अडत, हमाली, तोलाईसह इतर खर्च वाचला आहे. या पुढील काळातही थेट विक्रीचा मानस शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारकडून फळे आणि भाजीपाला या शेतीमालाचे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील नियमन काढून टाकले आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून वसूल होणारी अडत आणि बाजार खर्च हा यापुढे खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचादेखील निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोणतीही मध्यस्ती न घेता शेतकऱ्यांना थेट ग्राहक शेतीमालाची विक्रीस परवानगी मिळाली.

गुरुवारी (ता. ३१) बाजार समितीच्या आवारात पंढरपूर आणि बारामती येथील शेतकऱ्यांनी वांगी, टोमॅटो, शेवगा, कारली, दुधी भोपळा फळभाज्यांची थेट विक्री केली. बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या हस्ते या शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्री उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून केलेल्या शेतीमाल विक्रीचा आढावा घेतला. 

भोसे (ता. पंढरपूर) येथील शेतकरी हणमंत थिटे म्हणाले, ‘‘बाजार समितीने जागा उपलब्ध करून दिल्याने अडत्याशिवाय थेट विक्री करता आली. यामुळे शेतीमालास चांगला भाव मिळाला. त्याबरोबर शेतीमालाची विक्रीही लवकर झाली. तर अडत्याकडून कपात होणाऱ्या रकमेचीही बचत झाली.’’

थेट शेतीमाल विक्री दालन कायम सुरू राहावे  थेट शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीने काही वर्षांपूर्वी दालन सुरू केले होते. मात्र, काही दिवसांनी हे दालन बंद पडले. मात्र, आता पुन्हा दोन शेतकऱ्यांनी थेट विक्रीचा प्रयत्न केला. पुढे हे दालन कायमस्वरूपी सुरू राहावे. यासाठी बाजार समितीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com