नाशिक जिल्ह्यात 'मूठभर कापूस जाळा' आंदोलनातून कांदा उत्पादकांचा एल्गार

लॉकडाऊनमुळे कांद्याला फटका बसला. कुठे मार्केट सुरू नाही. उत्पादन खर्चही निघत नाही. मक्याचीही खरेदीही अडचणीची आहे. त्यामुळे मूठभर कापूस जाळून त्याभोवती कांद्याची रांगोळी काढून निषेध नोंदविला. हे प्रतिकात्मक आहे. सरकारने खरिपाच्या तोंडावर गांभीर्याने विचार करावा. - संतु पाटील झांबरे, जेष्ठ नेते,शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना.
 'A handful of cotton nets' in Nashik district Elgar of onion growers from the movement
'A handful of cotton nets' in Nashik district Elgar of onion growers from the movement

नाशिक : खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर येऊनही शेतकऱ्यांकडे असलेला कापूस विकला जात नाही. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यात कापूस खरेदीसह कांद्याच्या दर घसरणीबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एल्गार केला. काहींनी कापूस जाळला, काही ठिकाणी जाळलेल्या कापसाभोवती कांद्याची रांगोळी काढली. तर, काहींनी थेट कांद्याच्या माळा गळ्यात घालून सरकारचा निषेध नोंदविला. 

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या विचारत घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आता ‘सीसीआय’मार्फत खरेदी करण्यासाठी जिनिंगची संख्या वाढवावी व सरसकट सर्व कापूस खरेदी करावा, राज्यात भावांतर योजना जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. येवला येथे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या संध्या पगारे, अरूण जाधव व बापूसाहेब पगारे यांनी सहभाग घेतला. 

कळवण येथील प्रशासकीय कार्यालयासमोर प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, रवींद्र देवरे, शांताराम जाधव, जगन पाटील, महेंद्र हिरे आदींनी कापूस जाळून व कांद्याच्या माळा गळ्यात घालून सरकारचा निषेध केला. निफाड तालुक्यात थेरगाव येथे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोरडे, केदु बोराडे, दगु गवारे, तानाजी बोराडे आदींनी आंदोलन केले. जिल्ह्यात संघटनेच्या विविध कार्यकर्त्यांनी मुठभर कापूस जाळून सरकारने खरेदी करावी आणि कांद्याला रास्त दर देण्याबाबत दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com