agriculture news in marathi 'A handful of cotton nets' in Nashik district Elgar of onion growers from the movement | Page 3 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात 'मूठभर कापूस जाळा' आंदोलनातून कांदा उत्पादकांचा एल्गार

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

लॉकडाऊनमुळे कांद्याला फटका बसला. कुठे मार्केट सुरू नाही. उत्पादन खर्चही निघत नाही. मक्याचीही खरेदीही अडचणीची आहे. त्यामुळे मूठभर कापूस जाळून त्याभोवती कांद्याची रांगोळी काढून निषेध नोंदविला. हे प्रतिकात्मक आहे. सरकारने खरिपाच्या तोंडावर गांभीर्याने विचार करावा. 
- संतु पाटील झांबरे, जेष्ठ नेते, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना. 

नाशिक : खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर येऊनही शेतकऱ्यांकडे असलेला कापूस विकला जात नाही. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यात कापूस खरेदीसह कांद्याच्या दर घसरणीबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एल्गार केला. काहींनी कापूस जाळला, काही ठिकाणी जाळलेल्या कापसाभोवती कांद्याची रांगोळी काढली. तर, काहींनी थेट कांद्याच्या माळा गळ्यात घालून सरकारचा निषेध नोंदविला. 

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या विचारत घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आता ‘सीसीआय’मार्फत खरेदी करण्यासाठी जिनिंगची संख्या वाढवावी व सरसकट सर्व कापूस खरेदी करावा, राज्यात भावांतर योजना जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. येवला येथे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या संध्या पगारे, अरूण जाधव व बापूसाहेब पगारे यांनी सहभाग घेतला. 

कळवण येथील प्रशासकीय कार्यालयासमोर प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, रवींद्र देवरे, शांताराम जाधव, जगन पाटील, महेंद्र हिरे आदींनी कापूस जाळून व कांद्याच्या माळा गळ्यात घालून सरकारचा निषेध केला. निफाड तालुक्यात थेरगाव येथे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोरडे, केदु बोराडे, दगु गवारे, तानाजी बोराडे आदींनी आंदोलन केले. जिल्ह्यात संघटनेच्या विविध कार्यकर्त्यांनी मुठभर कापूस जाळून सरकारने खरेदी करावी आणि कांद्याला रास्त दर देण्याबाबत दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. 

 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम;...रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर सांगली  : जिल्ह्यात बुधवार (ता. ८)...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९...परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे...
दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र...रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
रताळे लागवडीसाठी सुधारित जातीरताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
टप्प्याटप्प्याने करतो डाळिंब बहराचे...शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब शेतकरी ः ज्ञानेश्वर...
कृषी हवामान सल्‍ला (मराठवाडा विभाग)भारतीय हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार,...
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...