agriculture news in marathi, In the hands of farmers again, 'Irony anchor' | Agrowon

बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

कर्ज काढून ट्रॅक्‍टर घेतलेल्या शेतकऱ्याला हप्ते भरणे शक्‍य नाही. फारच गंभीर परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांच्या हातात ‘लोखंड्या नांगर’ घेण्याची वेळ येणे ही कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची अधोगतीच म्हणावी लागेल.
-गणेश निंबाळकर, शेतकरी

गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव, निसर्गाची अवकृपा अन्‌ शेतकरीविरोधी धोरणांच्या परिणामांमुळे आर्थिक गर्तेतील बळिराजा आता कर्जाच्या खाईत लोटला गेला. यंदाचे खरीप अन्‌ रब्बी दोन्ही हंगाम शेतकऱ्याला वाचवू शकले नाहीत. म्हणूनच यापुढच्या शेतीसाठी यंत्रावर खर्च करण्याची क्षमताच गमावलेल्या हातात पुन्हा लोखंड्या नांगर घेण्याची वेळ आली. दुष्काळाच्या गडद छायेतील जिल्ह्यातील हे चित्र म्हणजे भांडवलाअभावी यांत्रिकी शेतीकडून पारंपरिक शेतीकडे वाटचाल आहे.

मागील काही वर्षांत निसर्गाच्या अवकृपेने कृषी उत्पादन घटले. त्यामुळे मागणी व पुरवठा या अर्थशास्त्राच्या न्यायाने ‘शेतमालाचे भाव तेजीत’ अशा बातम्या येणे अपेक्षित होते. मात्र बाजारभावासाठी रास्ता रोको, कांदे फेकले रस्त्यावर अशा शेतकऱ्याची व्यथा मांडणाऱ्या बातम्याच वाचावयास मिळाल्या. शेतकरीविरोधी धोरण बळीराजाला हवालदिल करतेय हा समान सूर प्रत्येक आंदोलनात उमटला. जिल्ह्यात शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी विविध आंदोलने झाली. यात ८०० रुपये प्रतिक्विंटल उत्पादनखर्च असताना हातात २०० रुपये प्रतिक्विंटल कांदा अनुदानावर काही पडले नाही. ही सर्व परिस्थिती बघता शेतकऱ्यांच्या पदरात कवडीही राहिली नाही. पण खचेल तो शेतकरी कसला. त्याची यातूनही बाहेर पडण्याची धडपड मात्र अव्याहत सुरूच आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांत नांगरणी करण्यास सुरवात झाली आहे. यंत्रयुगात बरीचशी नांगरणी ट्रॅक्‍टरने होत असताना अचानक शेतकऱ्याच्या हाती पारंपरिक लोखंड्या नांगर आल्याचे चित्र आहे. दुष्काळाचे भयाण वास्तव अन्‌ शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी त्यावरून स्पष्ट होते. ट्रॅक्‍टरने नांगरणी करायचे म्हटले तर एकरी एक हजार ५०० रुपये खर्च येतो. पण हा खर्च करणे परिस्थितीने अवघड झाल्याने दोन-अडीच तासांत होणारी नांगरणी शेतकरी चार बैलांच्या लोखंड्या नांगराने दिवस दिवस राबत करत आहे. यामुळे भांडवलाअभावी यांत्रिकी शेतीकडून पारंपरिक शेतीकडे वाटचाल सुरू झालीय, असे चित्र आहे.  


इतर अॅग्रो विशेष
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...