समाजातून मदतीसाठी पुढे सरसावले अनेक हात

समाजातून मदतीसाठी पुढे सरसावले अनेक हात
समाजातून मदतीसाठी पुढे सरसावले अनेक हात

मुंबई : महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत, तरुणांमधील कौशल्यविकास, तसेच महिलांची आर्थिक सुरक्षा, एकूणच समाजाच्या उभारणीसाठी पैसा, वेळ, तसेच उद्योजकता-व्यावसायिकतेचा कानमंत्र देण्याची तयारी दर्शविली आहे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यीन), तनिष्का व्यासपीठ, सकाळ रिलिफ फंड, सकाळ सोशल फाउंडेशन, अशा सामाजिक व्यासपीठांच्या धर्तीवरील नव्या अभियानाची घोषणा शनिवारी ‘सकाळ’ माध्यम समूहाने केली. तिचे समाजाच्या सर्वच स्तरांमधून स्वागत होत असून, त्यात विविध क्षेत्रांत यशोगाथा नोंदविणाऱ्या यशस्वी उद्योजक, व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. स्वयंसेवी संस्थाही योगदानासाठी सरसावल्या आहेत. बहुतेकांनी अभियानात प्रत्यक्ष सहभागी होऊन शिक्षण, नोकरी, कौशल्य विकास, स्टार्टअपस्‌, किफायतशीर शेती, कृषीप्रक्रिया आदींबाबत गरजूंना मार्गदर्शन, प्रत्यक्ष योगदान, गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. विशेषत: हे अभियान कोणत्याही जातिधर्मापुरते मर्यादित न ठेवण्याच्या आणि समाजानेच समाजासाठी एकत्र येण्याच्या, संकटातून मार्ग शोधण्याच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.   काहींनी एकीकडे प्रचंड बेरोजगारी आणि दुसरीकडे उद्योग व व्यवसायांमध्ये कुशल मनुष्यबळाची वानवा, असा विरोधाभास नजरेस आणून दिला. त्या पार्श्‍वभूमीवर, ‘सकाळ’चे हे अभियान एकूणच विकास प्रक्रियेत, समाजाच्या उभारणीत मोलाचे ठरेल, अशा प्रतिक्रिया आहेत. महाराष्ट्रात जन्मलेल्या ज्या व्यक्‍तींनी जागतिक पातळीवर कर्तबगारीची पताका फडकवली, त्यांच्या यशोगाथांमधून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असे काहींनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com