agriculture news in marathi, hands from society come foreword for help, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

समाजातून मदतीसाठी पुढे सरसावले अनेक हात

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 जुलै 2018

मुंबई : महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत, तरुणांमधील कौशल्यविकास, तसेच महिलांची आर्थिक सुरक्षा, एकूणच समाजाच्या उभारणीसाठी पैसा, वेळ, तसेच उद्योजकता-व्यावसायिकतेचा कानमंत्र देण्याची तयारी दर्शविली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत, तरुणांमधील कौशल्यविकास, तसेच महिलांची आर्थिक सुरक्षा, एकूणच समाजाच्या उभारणीसाठी पैसा, वेळ, तसेच उद्योजकता-व्यावसायिकतेचा कानमंत्र देण्याची तयारी दर्शविली आहे.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यीन), तनिष्का व्यासपीठ, सकाळ रिलिफ फंड, सकाळ सोशल फाउंडेशन, अशा सामाजिक व्यासपीठांच्या धर्तीवरील नव्या अभियानाची घोषणा शनिवारी ‘सकाळ’ माध्यम समूहाने केली. तिचे समाजाच्या सर्वच स्तरांमधून स्वागत होत असून, त्यात विविध क्षेत्रांत यशोगाथा नोंदविणाऱ्या यशस्वी उद्योजक, व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. स्वयंसेवी संस्थाही योगदानासाठी सरसावल्या आहेत.

बहुतेकांनी अभियानात प्रत्यक्ष सहभागी होऊन शिक्षण, नोकरी, कौशल्य विकास, स्टार्टअपस्‌, किफायतशीर शेती, कृषीप्रक्रिया आदींबाबत गरजूंना मार्गदर्शन, प्रत्यक्ष योगदान, गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. विशेषत: हे अभियान कोणत्याही जातिधर्मापुरते मर्यादित न ठेवण्याच्या आणि समाजानेच समाजासाठी एकत्र येण्याच्या, संकटातून मार्ग शोधण्याच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.  

काहींनी एकीकडे प्रचंड बेरोजगारी आणि दुसरीकडे उद्योग व व्यवसायांमध्ये कुशल मनुष्यबळाची वानवा, असा विरोधाभास नजरेस आणून दिला. त्या पार्श्‍वभूमीवर, ‘सकाळ’चे हे अभियान एकूणच विकास प्रक्रियेत, समाजाच्या उभारणीत मोलाचे ठरेल, अशा प्रतिक्रिया आहेत. महाराष्ट्रात जन्मलेल्या ज्या व्यक्‍तींनी जागतिक पातळीवर कर्तबगारीची पताका फडकवली, त्यांच्या यशोगाथांमधून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असे काहींनी म्हटले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...