Agriculture news in marathi Happy Dussehra, Diwali to flower growers | Agrowon

फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा, दिवाळीची आस लागली आहे. या हंगामातील निसर्ग चक्रीवादळ, मॉन्सून हंगामातील सततचा वादळी पाऊस, अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा, दिवाळीची आस लागली आहे. या हंगामातील निसर्ग चक्रीवादळ, मॉन्सून हंगामातील सततचा वादळी पाऊस, अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीने कंबरडे मोडल्यानंतर शेतकरी आता नवरात्र, दसरा, दिवाळी या प्रमुख हंगामाच्या आशेवर आहेत. या हंगामात चांगले दर मिळण्याचे संकेत आहेत.

पुणे बाजार समितीमधील फुलांचे प्रमुख आडतदार सागर भोसले म्हणाले,‘‘ यंदाचा फुलांचा हंगाम फारच वाईट सुरु आहे. काही प्रमुख सण सोडले, तर फुलांची मागणी कमीच आहे. कोरोना टाळेबंदीमध्ये सुमारे तीन महिने फुल बाजारासह निर्यात देखील बंद होती. फुले हे जिवनावश्‍क आणि फळे भाजीपाल्यासारखा आहारातील वस्तू  नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. फुलांचे शंभर टक्के नुकसान झाले.

कोरोना टाळेबंदी काही प्रमाणात शिथील झाल्यावर गणेशोत्सवात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. फुलांची मागणी अंशतः वाढली होती. मात्र गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा झाला. त्यामुळे विशेष फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. तर, आता नवरात्र, दसरा दिवाळीला मागणी वाढणार आहे.’’

‘‘गणेशोत्सवानंतर हे तीनच सण फुल उत्पादकांना चांगले पैसे देणारे ठरतात. यंदा आता कोरोना संकटातून शेतकरी सावरत आहेत. काही शेतकऱ्यांनी आता दसर दिवाळीसाठीचे नियोजन करुन, लागवडी केल्या आहेत. मात्र, आता लांबलेला मॉन्सून, परतीच्या मॉन्सूनचा देखील लांबलेला प्रवास, याचा परिणाम काय होतो, यावर दसरा, दिवाळीतील फुलांची आवक आणि मागणी अवलंबून राहिल. दर आतापेक्षा नक्की वाढतील, अशी शक्यता आहे.’’ 


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...