दिग्गज नेते भाजपत आल्याचा आनंद ः मुख्यमंत्री फडणवीस

दिग्गज नेते भाजपत आल्याचा आनंद ः मुख्यमंत्री फडणवीस
दिग्गज नेते भाजपत आल्याचा आनंद ः मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई ः महाराष्ट्रातल्या आपल्या कारकिर्दीने आपली वेगळी ओळख निर्माण केली असे दिग्गज लोक भाजपच्या परिवारात आले याचा मनस्वी आनंद होतो आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी म्हटले. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ अनुभव असलेले मधुकर पिचड भाजपत आले हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजात जे नेतृत्त्व मानले जाते असे पिचड आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी बुधवारी (ता. ३१) भाजपत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक या सगळ्यांनी भाजपत प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांनीही भाजपत प्रवेश झाला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश केला. 

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपत प्रवेश केला. या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत, ते भाजपत येणे ही आनंदाची बाब आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच कालिदास कोळंबकर हे लोकांमधून आलेले नेते आहेत. सामान्य माणूस आणि पोलिसांसाठी जे आंदोलन केले ती बाब चांगलीच आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप  दरम्यान, काँग्रेसचे नायगाव विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर येथे लाडू वाटप करून आनंद व्यक्त केला. पक्षाशी गद्दारी करून गेलेल्या कालिदास कोळंबकरांना नायगावची जनता धडा शिकवेल, असा टोला राजू वाघमारे यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com