वाढत्या उन्हाचा हापूसला तडाखा 

सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेच्या झळांनी आंबा बागायतदारांची झोप उडाली आहे. संवेदनशील हापूसला मोठा फटका बसला आहे.
mango heat
mango heat

रत्नागिरी ः सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेच्या झळांनी आंबा बागायतदारांची झोप उडाली आहे. संवेदनशील हापूसला मोठा फटका बसला आहे. आंबा अक्षरशः भाजून निघाला असून मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ लागली आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच यंदा हापूसला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. 

मध्य महाराष्ट्रातील वातावरणातील चक्रीय परिस्थितीने उष्णतेची लाट कोकण किनारपट्टीपर्यंत दाखल झाली आहे. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी प्रखर सुर्यकिरणांच्या झळांनी रत्नागिरी चांगलेच तापले आहे. दुपारच्या उन्हात नागरिकांना बाहेर पडण्यासाठी प्रचंड त्रास होत होता. मार्च महिन्यात पारा ३६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक जाण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याचा परिणाम हापूसवर झाला आहे. यंदा एक महिना हंगाम उशिरा असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराला छोटी कैरी धरलेली आहे. ती कैरी गळून पडत आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा १० टक्केच होता. त्याची तोड बहुतांश पूर्ण होत आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला आलेल्या आंब्याची तोड सुरु असून तो उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. 

दापोली येथील कोकण कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने पुढील तीन दिवस पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहील असा अंदाज वर्तविला आहे.  फळाला तडाखा  हापूसची साल कमी जाड असल्यामुळे त्यावर उष्णतेचा परिणाम होतो. जास्तीत जास्त ३४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आंब्याला पोषक आहे. त्यापुढे पारा वर गेला तर हापूसवर परिणाम होतो. प्रखर सुर्यकिरणांच्या तडाख्यात सापडून झाडाच्या दक्षिण व पश्‍चिमेकडील फळे भाजून निघाली आहे. फळाच्या आतील भागात साका तयार होण्याची भीती अधिक आहे. भाजलेला आंबा गळून जात आहे. याचा परिणाम उत्पादनावर होत आहे.  प्रतिक्रिया वाढत्या उष्णतेमुळे आंबा पिकावर परिणाम होणार आहे. दक्षिण व पश्‍चिमेकडील फळांवर काळे डाग, चट्टे, फळगळ आणि साका होऊ शकतो. त्यासाठी झाडांना दिडशे ते दोनशे लिटर पाणी दिले पाहिजे. शक्य असल्यास फळं पानांनी झाकण्याचा प्रयत्न करावा.  - विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी 

२०११ ला फयान वादळ झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात आंबा व्यावसायाला उतरती कळा आली आहे. हवामानातही बदल होत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे.  - आनंद देसाई, बागायतदार, रत्नागिरी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com