मुंबईत हापूसला कर्नाटकी आंब्याचा फटका 

गेल्या काही दिवसांत कोरोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. हापूस आंबा बाजारात पोहचवणे कठीण झाले होते. आता हापूस बाजारात येत आहे, मात्र त्याला कर्नाटकी आंब्याचा फटका सहन करावा लागत आहे.
hapus
hapus

मुंबई: गेल्या काही दिवसांत कोरोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. हापूस आंबा बाजारात पोहचवणे कठीण झाले होते. आता हापूस बाजारात येत आहे, मात्र त्याला कर्नाटकी आंब्याचा फटका सहन करावा लागत आहे. कर्नाटकी हापूस दिसायला कोकणच्या हापूससारखाच असल्याने नफा कमावण्यासाठी व्यापारी कर्नाटकचा आंबा हापूस असल्याचेच भासवून विकत आहेत. याचा फटका कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.  फळांच्या राजाला नेहमीच मोठी मागणी राहिली आहे. त्यामुळे बाजारात हापूस आंब्याचे दर कायम अधिक असतात. याचाच फायदा दरवेळी कर्नाटकच्या आंब्याला मिळत आला आहे. हा आंबा दिसायला हापूससारखाच असल्याने त्यातील फरक चटकन लक्षात येत नाही. याचा गैरफायदा घेऊन अनेक व्यापारी कर्नाटकचा आंबा कोकणातील हापूस आंब्याच्या नावे विकतात. कोकणातील हापूस आंबा ३०० ते ६०० रुपये डझनने विकला जातो. कर्नाटकमधील आंबा आकारानुसार ३० ते ८० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. त्यामुळे नफा कमावण्यासाठी अनेक व्यापारी कर्नाटकचा आंबा हापूस असल्याचेच भासवून विकत आहेत. याला ग्राहक बळी पडतात. परिणामी कोकणातील हापूस आंब्याची मागणी कमी झाली आहे, अशी माहिती आंबा विक्रेते विजय बेंडे यांनी दिली.  त्यामुळे हापूसच्या दरातही काही प्रमाणात घसरण झाली आहे. ३०० रुपये डझन असलेला हापूस आता २०० रुपये डझनवर आला आहे. याचा फटका कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या महिन्यापर्यंत कोरोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. आंबा बाजारात पोहचवणे अत्यंत कठीण झाले होते. आता आंबा बाजारात येत आहे, मात्र त्याला कर्नाटकी आंब्याचा फटका सहन करावा लागत आहे.  १०० गाड्या हापूसच्या  घाऊक फळ बाजारात दररोज ४५० ते ४७० गाड्यांची आवक होत आहे. त्यात १०० गाड्या हापूस आंब्याच्या असतात. ४० ते ५० गाड्या कर्नाटक आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या आंब्याच्या असतात. कर्नाटकचा आंबा मोठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक ठिकाणी तोच कोकणातील आंबा म्हणून विकला जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com