Agriculture news in Marathi Hapus mango season in danger | Page 3 ||| Agrowon

हापूस आंब्याचा हंगाम धोक्यात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत आलेल्या आंबा बागायतदारांना यंदा वातावरणातील बदलाचा फटका बसणार आहे. ७० टक्केहून अधिक हापूस कलमांना मोहोर आलेला नसल्यामुळे यंदाचा हंगाम अडीच महिन्यांचाच राहणार आहे.

रत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत आलेल्या आंबा बागायतदारांना यंदा वातावरणातील बदलाचा फटका बसणार आहे. ७० टक्केहून अधिक हापूस कलमांना मोहोर आलेला नसल्यामुळे यंदाचा हंगाम अडीच महिन्यांचाच राहणार आहे. शंभर दिवसांचा हंगाम यंदा सत्तर दिवसांवरच येईल, असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

मागील दोन वर्षे हापूसला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी कोरोना संकटामुळे लावलेले निर्बंध आणि नंतर वादळ व पावसाचा फटका, तर यंदा अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे कोकणच्या हापूसची मुंबईवारी लांबणार आहे. हापूसच्या सुरुवातीच्या हंगामाला पहिला फटका काही कोटी रुपयांत बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे ज्या झाडांना कणी धरली होती ते हापूस आंबे काळे पडून खाली पडले. 

शिवाय फुलोरा झालेल्या झाडांना बुरशी रोग येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता दररोज आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फवारणी करण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसह हापूसच्या बागा घेतलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यंदा १५ ते २० फेब्रुवारीपासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल, अशी स्थिती होती. मोहोराला चांगली सुरुवात झाली होती. मात्र, अवकाळी पावसाचा तडका बसल्याने मोहोर गळून पडण्याचे प्रमाण आहे. २० ते २५ एकर बागेचा फवारणीचा खर्च हा ७० हजार रुपये येतो. त्यामुळे संकटाला सामोरे जाण्याची वेळ उत्पादक, व्यापाऱ्यांवर आली आहे.

मोहोर येण्यास पोषक वातावरण नाही. थंडी अवघी चारच दिवस होती, पण पाठोपाठ ढगाळ वातावरणही निर्माण होत आहे. परिणामी माहोर येण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन येईल.
तुकाराम घवाळी, आंबा बागायतदार, रत्नागिरी


इतर बातम्या
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...
अचलपूर तालुक्यातील तीन कृषी...अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने...
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’ नागपूर ः बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच पिकांची...
इथेनॉलच्या दरात दुजाभाव नकोधान्यापासून इथेनॉल उत्पादित करणाऱ्यांनी सरकारकडे...