पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
बाजारभाव बातम्या
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीत
सांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप तीन-चार महिने बाकी आहेत. तत्पूर्वी सांगलीच्या बाजारात दक्षिण आफ्रिका खंडातील मालवी देशातील हापूस आंबा गुरुवारी (ता. १४) दाखल झाला. विष्णू अण्णा फळ मार्केटमधील मुसा आबालाल बागवान यांच्या दुकानात आंब्याच्या पंधरा पेट्या दाखल झाल्या. आजच्या मुहूर्ताच्या सौद्यामध्ये डझनाच्या पेटीला २५०० रुपये दर मिळाला.

दक्षिण आफ्रिका खंडातील मालवी देशातील वातावरण आपल्याकडील कोकणासारखे आहे. त्यामुळे तिथे रत्नागिरी, देवगड परिसरातील हापूस आंब्याचे कलम नेऊन संशोधन करून यशस्वी लागवड करण्यात आली आहे. तेथे देखील तो हापूस नावाने ओळखला जातो. आपल्याकडील हंगामापूर्वी चार महिने तिथे आंबा पिकतो. त्यामुळे तेथून तो थेट भारतात आयात केला जातो. मुंबई-पुणेमध्ये नुकताच मालवी देशातील हापूस आंबा दाखल झाला आहे.
सांगलीतील खवय्यांना या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी फळ मार्केटमधील बागवान यांच्या दुकानात मालवीतील हापूस आंब्याच्या एक डझनाच्या १५ पेट्या मागवण्यात आल्या आहेत. चवीला आपल्याकडील हापूससारखाच असलेला आंबा मुंबई-पुणे परिसरात प्रसिद्ध आहे. सांगलीत यंदा प्रथमच हा आंबा दाखल झाला आहे.
डिसेंबरपर्यंत चव चाखा
मालवीतील हापूस आंब्याचा हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबरअखेर चालतो. तसेच कोकणातील हापूस येण्यास अवधी असल्यामुळे तोपर्यंत सांगलीकरांना मालवीचा हापूस आंबा चाखता येईल. मात्र त्यासाठी जादा दर मोजावा लागेल.
- 1 of 40
- ››