आंबा पिकविण्याविषयी अपप्रचाराचा हापूसला फटका
आंबा पिकविण्याविषयी अपप्रचाराचा हापूसला फटका

आंबा पिकविण्याविषयी अपप्रचाराचा हापूसला फटका

चिपळूण, जि. रत्नागिरी : मुंबईच्या बाजारात हापूस आंब्याला चांगला दर मिळाल्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेत अद्याप आंबा विक्री सुरू केली नव्हती. मात्र मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर आंबा पिकविण्याविषयी अपप्रचार सुरू झाला. त्यामुळे आंब्याचे दरही घसरले आहेत.  मुंबईकडे पाठविण्यात येणारा आंबा व्यापारी आता स्थानिक बाजारपेठेत विकत आहेत. स्थानिक बाजारपेठेपेक्षाही मुंबई मार्केटला चांगला दर मिळत असल्यामुळे येथील व्यापारी मुंबईला आंबा पाठवीत होते. 

एफडीएच्या धाडीनंतर आंबा पिकविण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो, तो आरोग्यास घातक असल्याचा मेसेज व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. असा हापूस आंबा खरेदी करू नका, असा अपप्रचारही सुरू झाल्याने आंब्याचे दर खाली आले. 

आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर बंद करण्यात आला. इथिलीनचा वापर होतो. ते अधिकृतपणे उपलब्ध असते. त्याच्या वापरामुळे फळांना रंग प्राप्त होतो. त्याची मात्राही ठरली आहे. त्याच्या विक्रीवर बंदी नाही. शासनाने याविषयी नक्की आंबा कसा पिकवायचा, कोणते औषध वापरावे हे स्पष्ट करावे. -सूरज बामणे,  आंबा बागायतदार कळवंडे, चिपळूण

चांगल्या प्रतीचा आंबा 250 ते 800 रुपये डझन  एक आठवड्यापूर्वी घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा आंबा २५० ते ८०० रुपये डझन विकला जात होता. हा दर  १५० ते ६०० रुपये झाला. दुसऱ्या क्रमांकाचा आंबा १५० ते ४०० रुपये किलो दराऐवजी १०० ते ३०० रुपये झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com