थेट विक्रीतून हापूसला मिळविला दुप्पट दर

सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे परिपक्व स्थितीत येत असलेला फळांचा राजा हापूस आंबा संकटांत सापडला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी हतबलता दर्शविलीय परंतु शासनाने आंबा विक्रीला परवानगी दिल्यानंतर थेट ग्राहक शोधण्याचे आव्हान सहज पेलत अनेकांनी दीडपट ते दुप्पट भाव मिळविला. ओढवलेल्या परिस्थितीमुळे थेट ग्राहक हा सक्षम पर्याय समोर आला आणि दलाल ही संकल्पना पुसट झाली. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन कालावधी हापूस उत्पादकांसाठी परिवर्तन काळ ठरण्याची शक्यता आहे.
Hapus received double the direct sales
Hapus received double the direct sales

सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे परिपक्व स्थितीत येत असलेला फळांचा राजा हापूस आंबा संकटांत सापडला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी हतबलता दर्शविलीय परंतु शासनाने आंबा विक्रीला परवानगी दिल्यानंतर थेट ग्राहक शोधण्याचे आव्हान सहज पेलत अनेकांनी दीडपट ते दुप्पट भाव मिळविला. ओढवलेल्या परिस्थितीमुळे थेट ग्राहक हा सक्षम पर्याय समोर आला आणि दलाल ही संकल्पना पुसट झाली. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन कालावधी हापूस उत्पादकांसाठी परिवर्तन काळ ठरण्याची शक्यता आहे.

‘कोरोना’चे भयावह संकट जगावर ओढवले. त्याला भारत देखील अपवाद ठरलेला नाही. ‘कोरोना’ला थोपविण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. राज्यातही संचारबंदी लागू करण्यात आली. याचा फटका उद्योग, व्यापार क्षेत्रांना बसला. त्यापेक्षा कित्येक पटीने कृषी क्षेत्राला बसला. फळांचा राजा हापूस हा सुद्धा त्या दुष्टचक्रातून सुटलेला नाही. देवगड, वेंगुर्ला, मालवण आणि कुडाळ तालुक्याच्या  काही भागातील हापूस बाजारपेठेत दाखल होण्याच्या तयारीत असतानाच लॉकडाऊन कालावधी सुरू झाला.

अचानक ओढवलेल्या या संकटामुळे हापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. त्याला काय करावे हे सूचेनासे झाले. आठ दहा दिवसानंतर हापूस विक्री, वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानंतर खऱ्या अर्थाने बागायतदारांमध्ये आपआपला आंबा विक्री करण्यासाठीचे मार्केटिंगचे कौशल्य पुढे येऊ लागले.

बहुतांशी व्यापाऱ्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक अशा विविध शहरांत थेट ग्राहक, सोसायट्यांमध्ये आंबा विक्रीचा प्रयत्न केला. त्याचे सकारात्मक परिणाम येऊ लागले. कायम दलाल बागेत येऊन आंबा घेऊन जाईल या मानसिकतेत असलेले हजारो बागायतदार आपल्या आंब्याची विक्री व्हावी यासाठी प्रयत्न करू लागले. शहरातील विविध सोसायट्यांमध्ये आंबा जाऊ लागल्यामुळे ग्राहकांना कमी दरात आंबा मिळू लागला. तर आंबा उत्पादकांना दलालांकडून मिळणाऱ्या दरापेक्षा ३० ते ४० टक्के अधिक भाव मिळू लागला.   वाशी मार्केटमध्ये १२०० रूपये दर असताना थेट विक्री करणाऱ्या बागायतदारांनी २५०० रूपये दर मिळविला आहे. लॉकडाऊन काळात बागायतदारांनी आत्मसात केलेले मार्केटिंग कौशल्य भविष्यात त्यांना फायदेशीर ठरणार आहे. हा काळ पुढील काळासाठी परिवर्तन काळ ठरेल, असे यशस्वी बागायतदारांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकियेमुळे दलालांची साखळी तुटेल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना आहे. 

माझ्याकडे दीडशे ते दोनशे पेटी आंबा होता. लॉकडाऊन कालावधीत या आंब्याची विक्री आम्ही केली. मुंबई, पुणे, कोल्हापूर या शहरातील सोसायट्यांमधील ग्राहकांशी सपंर्क साधून ही विक्री करण्यात आली. त्याचा मोठा फायदा आम्हाला झाला. वाशीमध्ये ज्यावेळी १२०० रूपये दर होता त्यावेळी आम्हाला पेटीला २५०० रूपये दर मिळाला. सध्या माझ्या जवळील आंबा संपला आहे. परंतु अजूनही अनेक ग्राहक माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात थेट ग्राहक हा उत्तम पर्याय आम्हाला मिळाला आहे. बागायतदारांनी दलालांवर अवलंबून राहण्याची मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. - प्रा. विवेक चव्हाण, आंबा उत्पादक शेतकरी, शिरगाव-आंबेखोल, देवगड,

लॉकडाऊन काळातच आपला आंबा तयार झाला. त्यामुळे एकादृष्टीने मोठे संकट उभे होते. परंतु थेट मुंबईतील अनेक ग्राहकांशी फोनद्वारे थेट संपर्क साधत सोसायट्यांपर्यंत आंबा पोहोचविला. बागेतील परिपक्व आंबा सुमारे ७०० पेटी माल आतापर्यंत विक्री केला आहे. त्याला साधारणपणे २ हजार ते अडीच हजार रूपये दर मिळाला. दलालांची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊल कालावधी उपयुक्त ठरला - प्रताप गावसकर, शेतकरी, वेंगुर्ला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com