ढगाळ वातावरणाचे हापूसपुढे आव्हान

यंदा जून महिन्यात झालेले चक्रीवादळ, दीर्घकाळ लांबलेला पाऊस आणि पुरेशा थंडीचा अभाव यामुळे अजूनही आंबा तयार होण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलेला नाही.
mango
mango

रत्नागिरी ः जानेवारी महिन्यात वाशीमधील घाऊक बाजारात हापूसची चाहूल लागायला सुरुवात होते; मात्र यंदा जून महिन्यात झालेले चक्रीवादळ, दीर्घकाळ लांबलेला पाऊस आणि पुरेशा थंडीचा अभाव यामुळे अजूनही आंबा तयार होण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलेला नाही. दहा दिवसांच्या अंतरांनी ढगाळ वातावरणाचा अडथळा बागायतदारांपुढे आव्हान निर्माण करत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून वाशीच्या घाऊक बाजारात कोकणातून हापूस आंब्याच्या मुहूर्ताच्या पेट्या यायला सुरुवात होते. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू होतो. या हंगामात पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे कलमांना पालवी आली. ती जून होण्यासाठी पूरक हवामान रत्नागिरी जिल्ह्यात नाही. याबाबत रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील बागायतदार आनंद देसाई म्हणाले, की ढगाळ वातावरणामुळे रोगराई निर्माण होईल. सध्याची स्थिती हापूसला हानिकारक आहे. थंडी नसल्यामुळे पालवी जून होण्यास वेळ लागेल. सध्या दहा टक्के मोहोर आला आहे. त्यामध्येही सर्वाधिक मोहोर मेल आहे. त्यामधून फळधारणा कमी राहील. या परिस्थिती वातावरण ढगाळ होत राहिले तर अडचणीत वाढतील. तुडतुड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आठ दिवसांनी फवारणी करावी लागत आहे. थ्रिप्सचाही प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसत आहे. शनिवारी, रविवारी दोन ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. तसे झाले तर आलेली फळे गळून जातील.

हंगामापुढील आव्हाने

  • पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे कलमांना पालवी 
  • पालवी जून होण्यासाठी पूरक हवामान नाही
  • निसर्ग चक्रीवादळाने अनेक बागा उद्ध्वस्त 
  • ढगाळ वातावरण, पावसाचाही फटका
  • आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव
  • पुरेशी थंडी नसल्याने मोहरावर परिणाम
  • प्रतिक्रिया डिसेंबर महिन्यात वातावरणात चढ-उतार सुरू आहेत. १५ जानेवारीपर्यंत थंडीची स्थिती काय राहील यावर आंबा हंगाम पुढे कसा येईल हे सांगू शकतो. सध्या पालवी जून होण्याची प्रकिया सुरू आहे. मोहोर येण्यासाठी पूरक वातावरण नाही. - डॉ. पराग हळदणकर, संशोधक,  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com