Agriculture News in Marathi Hapus will go mango In the United States two years later | Agrowon

हापूस आंबा जाणार दोन वर्षांनंतर अमेरिकेत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे गेली दोन वर्षे अमेरिकेला होणाऱ्या आंब्याच्या निर्यातीत अडथळे आले होते; मात्र केंद्र सरकारने यंदा तो दूर केला आहे.

रत्नागिरी ः कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे गेली दोन वर्षे अमेरिकेला होणाऱ्या आंब्याच्या निर्यातीत अडथळे आले होते; मात्र केंद्र सरकारने यंदा तो दूर केला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाकडून यंदाच्या हंगामात भारतीय आंब्यांना निर्यातीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे अमेरिकन ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीच्या हापूसची चव दोन वर्षांनी चाखायला मिळणार आहे. देशभरातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या विविध आंब्याच्या तुलनेत हापूसचा टक्का सर्वाधिक असतो.

अमेरिकेच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या निर्यात मंजुरीमुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश,  आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा या भागातील उत्पादित आंब्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे भारताच्या उत्तर तसेच पूर्व भागातील उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्‍चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या लंगडा, दशहरी, फझली आदी आंब्यांसह कोकणातील हापूसची चव अमेरिकन ग्राहकांना चाखावयास मिळणार आहे.

देशभरातून अमेरिकेला १ हजार टन आंबा निर्यात होतो. त्यामध्ये तीनशे टन हापूस आहे. अमेरिकेत सर्वाधिक हापूसला मागणी आहे. कोरोनामुळे थांबलेली निर्यात पुन्हा एकदा सुरू होणार आहे. तसेच २०२२ मधील आंबा निर्यात २०१९-२० पेक्षा अधिक असेल असा अंदाज निर्यातदारांनी वर्तविला आहे.

कोविड महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, अमेरिकेच्या कृषी विभागातील निरीक्षकांना आंब्यांवरील विकिरण सुविधेची तपासणी करण्यासाठी भारतात येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे २०२० पासून भारतीय आंब्यांच्या अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते.

२३ नोव्हेंबर २०२१ रोजी १२ वी भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाची बैठक झाली. त्यातील निर्णयांना अनुसरून भारताचे कृषी मंत्रालय आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्या दरम्यान परस्परांच्या कृषी बाजारांमध्ये मालाला प्रवेश देण्याचा करारावर झाला. या करारानुसार, भारतीय आंबे तसेच डाळिंबे यांची अमेरिकेला निर्यात होणार असून, अमेरिकेची चेरी आणि अल्फाल्फा ही पिके भारतात आयात होणार आहेत. यासाठी विकिरण प्रक्रिया अत्यावश्यक करण्यात आली आहे.
 

प्रतिक्रिया

कोरोनामुळे गेली दोन वर्षे अमेरिकेतील निर्यात थांबलेली होती. त्यामुळे आंबा बागायतदारांचे एक परदेशी मार्केट बंद होते. यंदा ते खुले झाल्यामुळे शेतकऱ्याला निश्‍चितच फायदा होणार असून दरही चांगला मिळेल.
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार


इतर अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...