अकोला जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर हरभऱ्याचे नियोजन

अकोला जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर हरभऱ्याचे नियोजन
अकोला जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर हरभऱ्याचे नियोजन

अकोला  ः आगामी रब्बी हंगामात यावर्षी जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एक लाख दोन हजार हेक्टर हरभऱ्याचेच क्षेत्र नियोजित करण्यात आले आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होत असल्याने रब्बीच्या आशा उंचावल्या आहेत. शिवाय खरिपात नापेर राहिलेले क्षेत्र रब्बी लागवडीखाली येईल. यासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली. कृषी विभागानेही रब्बी क्षेत्राचे नियोजन करीत बियाणे, खताची मागणी शासनाकडे केली. त्याला मंजुरीही मिळाली आहे.  अकोला जिल्ह्यात सातही तालुक्यांत याही वर्षी हरभऱ्याची लागवड अधिक राहणार आहे. प्रामुख्याने अकोला तालुक्यात एकूण नियोजनाच्या २६ हजार ५०० हेक्टरवर हरभरा असेल. या शिवाय अकोट तालुक्यात २० हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले. सोबतच बार्शीटाकळी तालुक्यात ११ हजार, मूर्तिजापूर १३९००, तेल्हारा १३ हजार, बाळापूर ८ हजार आणि पातूरमध्ये ९६०० हेक्टरवर हरभरा लागवड अपेक्षित आहे. जिल्ह्यात गव्हाचे १८ हजार ७११ हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. अकोला तालुक्यातच सर्वाधिक ४३२९ हेक्टरवर लागवड होणार आहे. रब्बीत लागवड होणाऱ्या पिकांची वाणनिहाय बियाणे मागणीसुद्धा नोंदविण्यात आली आहे.  ओवा, कांद्याच्या क्षेत्रात वाढ मसालावर्गीय ओवा पिकाचे क्षेत्र जिल्ह्यात दरवर्षी विस्तारत आहे. खारपाण पट्ट्यात ओव्याची फायदेशीर शेती होऊ लागली आहे. यावर्षी रब्बीत किमान ७०० हेक्टरवर ओव्याची पेरणी नियोजित करण्यात आली. रब्बीत कांदा तसेच कांदा बीजोत्पादन याचेही नियोजन करण्यात आले. कांद्याची सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर वाढ होऊ शकते. तर कांदा बीजोत्पादनाचे तीन हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.   ५१ हजार १०० मेट्रीक टन खताचे नियोजन रब्बीच्या पिकांसाठी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत महिनानिहाय रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे. यात युरिया १२ हजार मेट्रीक टन, डीएपी ८०००, एमओपी २१००, कॉम्प्लेक्स २०३००, एसएसपी ८०००, इतर ७०० असे मिळून ५१ हजार १०० मेट्रीक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली. शासनाकडून ४७ हजार ७१० मेट्रीक टन खतांना मंजुरी दिली आहे.  

रब्बीचे पीकनिहाय नियोजित क्षेत्र

हरभरा  १०२०००
गहू   १८७११
ओवा   ७००
कांदा   ३४४४ 
कांदा बीजोत्पादन  ३०००
एकूण   १२७८१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com