मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
अॅग्रो विशेष
हरिभाऊ जावळे यांनी स्वीकारला कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार
पुणे ः कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार आमदार हरिभाऊ जावळे यांनी कृषी परिषदेचे प्रभारी महासंचालक आर. बी. भागडे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २९) स्वीकारला. या वेळी सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय मेहता, कृषी परिषदेचे विस्तार विभागाचे संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, प्रशासन विभागाचे सहसंचालक गणेश घोरपडे आदी उपस्थित होते.

श्री. जावळे मूळचे जळगाव जिल्ह्यातील भालोद येथील रहिवासी आहेत. १९९९ मध्ये यावलमधून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर दोन वेळा खासदार झाले. तसेच २०१४ मध्ये रावेर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
श्री. जावळे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शेती व व्यवसाय केला. शेती करत असताना खताच्या व्यवसायाला सुरवात केली. सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी शेतकऱ्यांचे सेमिनार आणि मेळावे आयोजित केले. केळी आणि केळी पिकावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग यावर अभ्यासासाठी केळी संशोधन केंद्र त्रिची, मैसूर आणि नवसारी विद्यापीठ येथे प्रशिक्षण घेतले.
शेती-सहकाराचा दांडगा अभ्यास असलेला ग्रामीण भागातील विश्वासू चेहरा म्हणून ओळख जाते. केळी खोडावर प्रक्रिया करून त्याद्वारे सेंद्रिय द्रव्य खते (टाकाऊपासून टिकाऊ या धर्तीवर) भारतातील पहिला प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प उभा केला. इंधनात बचत होऊन उत्पादन खर्च कमी व्हावा, या उद्देशाने स्पेंटवॉशपासून बायोगॅसनिर्मितीचा प्रकल्प उभारला.
- 1 of 653
- ››