उत्पन्न, खर्चाचा मेळ घाला : हरिभाऊ बागडे

संकटाला संधी म्हणून राज्याचा पशुसंवर्धन विभाग काम करतोय. राष्ट्रीय स्तरावरील पशुधन महाएक्सपो २०१९ मुळे पशु पक्षांच्या विविध जातीची माहिती होऊन पूरक पर्यायाची, रोजगाराची संधी निर्माण होईल ही आशा आहे. - महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र
पशुपक्षी प्रदर्शन
पशुपक्षी प्रदर्शन

जालना : गायीला कामधेनू का म्हटले, हे लक्षात घ्या. तिचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने तिचे संवर्धन आवश्यक. देशी गोधनाचे महत्त्व ओळखा. संकटात घाबरून जाऊ नका, पर्याय शोधून मार्ग काढा. आपले उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घाला, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेतकरी आणि पशुपालकांना केले. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार संदीपान भुमरे, औरंगाबाद जि. प. अध्यक्षा देवयानी डोंणगावकर, जालना जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, माफसूचे कुलगुरू डॉ. पातूरकर, शेष महाराज गोंदीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य कुमार आदी उपस्थित होते. 

प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त श्री. उमाप यांनी केले. प्रदर्शन आयोजनामागील भूमिका त्यांनी विशद केली. जानेवारी ते जून दरम्यान राज्यात चारा लागवड अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रस्ताविकातून डॉ. उमाप यांनी दिली. प्रदर्शनाबद्दल माहित देताना आयुक्त.. आणि महाकाय रेडाही पहा.. video...  

२ फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे प्रदर्शन ४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असून ३ फेब्रुवारीला युवा नेते आदित्य ठाकरे प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती राज्यमंत्री खोतकर यांनी दिली. उदघाटनाला सुरवातीला चांगले काम करणाऱ्या सावित्रीबाई महिला बचत गट धानोरा, फकिरबाबा बचत गट दहयाळ, जय श्री कृष्ण बचत गट तळणी या बचत गटातील महिलांचा गौरव करण्यात आला. चारा साक्षरता अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या पशुधन खात्यातील दहा अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. सुल्तान, युवराज, कोहिनूर आकर्षण हजारोच्या संख्येने प्रदर्शन पाहायला आलेल्या पशुपालकांचे हरियाणातील सुलतान व युवराज तसेच पंजाब पाकिस्तान सीमेवरील कोहिनूर रेडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शंभरवर स्टाॅल; विविध जातीच्या पशू-पक्ष्यांचा समावेश  शासन, सेवाभावी संस्था, कृषी, पशुपालनसंबंधी काम करणारे घटक यांचे जवळपास शंभर स्टॉल या प्रदर्शनात आहेत. शिवाय बचत गटाचेही स्टॉल आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती पशुपालकांना या प्रदर्शनीच्या माध्यमातून करून घेण्याची सोय करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनात देशातील विविध जातींच्या गायी, म्हशी, वळू, शेळ्या, मेंढ्या, घोडे, कोंबड्या आदी पशुपक्ष्यांचा समावेश आहे. गीर, साहिवाल, थारपारकर, राठी व वेचूर या अधिक दूध देणाऱ्या देशी गायी प्रदर्शनाचे आकर्षण आहेत.  प्रतिक्रिाय ''एनी टाईम मनी'' हा कन्सेप्ट घेऊन पशुसंवर्धन विभाग काम करतोय. महा पशुधन एक्स्पो २०१९ च्या निमित्ताने तमाम शेतकरी बांधवांनी चिकित्सकपणे माहिती घेऊन प्रश्न विचारून समाधान करून घेत शेतीला जोड पर्यायाची निवड करावी - कांतिलाल उमाप, आयुक्त, पशुसंवर्धन ज्याच्या घरी पशुधन तो समृद्ध शेतकरी. शेतीला पशुधनाची तंत्रज्ञानाची जोड दिली की विकास साधता येतो. पशुप्रदर्शनामुळे याविषयीच्या शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्याची संधी निर्माण झाली. - एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com