कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी हरिभाऊ जावळे

कृषी विद्यापीठे व इतर संस्थांच्या माध्यमातून कृषी संशोधनासंबंधी काम होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे ध्येय कसे पूर्ण होईल? याबाबत माझा कटाक्ष असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न या जबाबदारीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. - हरिभाऊ जावळे, नूतन उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद.
हरिभाऊ जावळे
हरिभाऊ जावळे

जळगाव   : रावेर (जि. जळगाव) विधानसभा क्षेत्राचे आमदार हरिभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जावळे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असणार आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी किंवा राज्य शासनाची मर्जी असेल तोपर्यंत असणार आहे, अशी माहिती मिळाली. 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबत पत्र जारी केले आहे. श्री. जावळे यांची उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आल्याचे उपसचिव सु. सं. धपाटे यांनी त्यात म्हटले आहे. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे हे या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात एकूण चार कृषी विद्यापीठे असून, या चारही संस्थांमध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली.

कृषी विद्यापीठांच्या कार्याचा आढावा घेणे, मूल्यमापन करणे, पर्यवेक्षण करणे आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी परिषदेवर सोपविण्यात आली आहे. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहे. परिषदेच्या या कार्यवाहीत आमदार जावळे यांची मोठी भूमिका या नियुक्तीमुळे राहणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com