सर्वच फळपिकांत अति घनलागवडीचा वापर नुकसानकारक ः डॉ. पाटील

बदनापूर, जि. जालना : फळपिकांत अति घनलागवडीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आहे. या सल्ल्याचा सर्वच फळपिकांत प्रयोग करणे नुकसानकारक आहे,’’ असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.
 Harmful use of very dense plantings in all fruit crops : Patil
Harmful use of very dense plantings in all fruit crops : Patil

बदनापूर, जि. जालना : ‘‘जमिनीचा पोत, झाडाच्या वाढीची अवस्था, फळधारणेची स्थिती, बुटक्या खुंटाचा अभाव आदी बाबींचा अभ्यास न करता केवळ अति उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर सगळ्याच फळपिकांत अति घनलागवडीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आहे. या सल्ल्याचा सर्वच फळपिकांत प्रयोग करणे नुकसानकारक आहे,’’ असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

राजेवाडी (ता. बदनापूर) येथे मंगळवारी (ता. ७) आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य भानुदास घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार, कार्यक्रम सहयोगी डॉ. सचिन सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी नवनाथ कोकाटे, तालुका कृषी अधिकारी वेंकट ठके आदी उपस्थित होते. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘ठरावीक फळपिकांत उत्पादनाच्या दृष्टीने छाटणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, काही फळझाडे शेंड्याकडील नवीन फुटीवर फळे देतात, तर काही फळझाडे आतील पानोळ्यात फळधारणा देतात. तर काहींना तानावर सोडून छाटणी करावी लागते. याचा अर्थ सगळ्याच झाडांना छाटणी करता येत नाही. परिणामी अति घनलागवडीमुळे अन्नद्रव्याच्या, सूर्यप्रकाशाच्या बाबतीत झाडात स्पर्धा निर्माण होऊन झाडे उभट वाढीची बनतात. यासाठी कृषी विद्यापीठाची लागवड शिफारस न पाळल्याने डाळिंब पिकाची मराठवाड्यात काय परिस्थिती झाली, याचा अभ्यास करावयास हवा.’’ 

पाटील म्हणाले, ‘‘फळपिकात हवा खेळती न राहिल्याने बागेत दमट वातावरण निर्माण होऊन किडी-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढीस लागू शकतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनाच्या, फळाच्या प्रतीवर होऊन बाजारपेठेत दर कमी मिळतो. म्हणून फळबागांतदेखील शारीरिक अंतराचा वापर करावयास हवा. लागवडीनंतर २५-३० वर्ष उत्पादन देणारी फळझाडे जर घनलागवड करून ८ ते १० वर्षांत नष्ट होणार असतील तर कसला फायदा होणार?’’ 

कृषी विद्यापीठाने लागवडीच्या अंतराच्या शिफारसी का केल्या आहेत, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

शिंदे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांचा वापर करून रसायनविरहित शेतीला चालना द्यावी. उत्पादन खर्च कमी करावा.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com