सहकार चळवळीमुळेच ग्रामीण भागात अर्थक्रांती ः हर्षवर्धन पाटील

सहकार चळवळीमुळेच ग्रामीण भागात होणार अर्थक्रांती ः हर्षवर्धन पाटील
सहकार चळवळीमुळेच ग्रामीण भागात होणार अर्थक्रांती ः हर्षवर्धन पाटील

सोलापूर  ः ग्रामीण भागाच्या विकासात सहकार चळवळीचे योगदान मोठे असून, सहकारी संस्थांमुळेच ग्रामीण भागात अर्थक्रांती घडल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता. ३) येथे केले. पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमालेत माजी सहकारमंत्री पाटील यांनी ‘ग्रामीण विकासात सहकाराचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. श्री. पाटील म्हणाले, की सहकारी चळवळीमुळे अर्थकारण बदलले आहे. राज्याची साडेतेरा कोटी लोकसंख्या आहे. यातील पाच कोटी लोकसंख्या विविध सहकारी संस्थांशी जोडली गेली आहे. सहकारी संस्थांमध्ये पाच लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. विविध ५९ प्रकारच्या संस्थांचा सहकारामध्ये समावेश आहे. सहकारी संस्थांमुळे एकत्रीत काम करण्याबरोबरच सर्वांना सन्मान, सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी राहण्याबरोबरच अर्थक्रांती घडण्यास मदत होते. यापुढेही सहकार चळवळ चांगल्या प्रकारे टिकण्यासाठी व्यावसायिकता वाढणे आवश्यक आहे. युवा वर्गाचा त्यामध्ये योगदान महत्त्वाचेे असल्याचेही माजी मंत्री पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.  या वेळी माजी मंत्री पाटील यांनी सोलापूर विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाबद्दल समाधान व्यक्त करत यापुढे विद्यापीठास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य यांनी केले, आभार प्र- कुलगुरू पाटील यांनी मानले.  युवा वर्गाचा सहभाग आवश्यक  कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी भारतामध्ये रशियन मॉडेलपासून सहकार चळवळ आली आणि महाराष्ट्रामध्ये अधिक समृद्ध झाल्याचे सांगितले. सहकारी संस्थांच्या विकासावरच पुढे महाराष्ट्रात राज्यपाल अलेक्झांडर असताना विभाग पडल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. सहकारी चळवळीत सध्या युवा वर्गाची संख्या कमी असून, ती पुढे वाढण्याची अपेक्षा कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com