देऊळगावला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उडीद पिकाचा कापणी प्रयोग

देऊळगावला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उडीद पिकाचा कापणी प्रयोग
देऊळगावला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उडीद पिकाचा कापणी प्रयोग

अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या उडीद पिकाचा कापणी प्रयोग जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अकोट तालुक्यातील देऊळगाव येथे बुधवारी (ता. २) दुपारी झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी सिद्धभट्टी, तहसीलदार श्री. गीते, गटविकास अधिकारी पाचपाटील, सरपंच अभिजित गावंडे, पोलिस पाटील परीक्षित गावंडे, मंडळ कृषी अधिकारी अतुल भारसाकळे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत ठाकरे, शेतकरी पंचफुला भुजंगराव वानखडे उपस्थित होत्या. वानखडे यांनी लागवड केलेल्या शेतात उडीद पिकाचा कापणी प्रयोग घेण्यात आला. तंत्रशुद्ध पद्धतीने मोजमाप करून निरीक्षणे नोंदविण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी, कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शनही केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com