Agriculture News in Marathi To harvest paddy Beginning in Sindhudurg | Page 2 ||| Agrowon

भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या भातपीक कापणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, शेतशिवारे शेतकऱ्यानी गजबजल्याची चित्र दिसत आहेत. 

सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या भातपीक कापणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, शेतशिवारे शेतकऱ्यानी गजबजल्याची चित्र दिसत आहेत. 

जिल्ह्यात सप्टेंबर अखेरीपासून भातपीक परिपक्व होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत तर जिल्ह्यातील सुमारे ७५ टक्के भातपीक परिपक्व झाले आहे. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात कापणी करता आलेली नाही. अनेक शेतकऱ्यांचे भातपीक पावसामुळे जमिनीवर आडवे झाले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत होता. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १५) काही भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. परंतु सकाळपासून पावसाने चांगली उघडीप दिली होती. त्यामुळे पाऊस पडला तरी तो सायंकाळी उशिरा पडेल, अशी शक्यता गृहीत धरून आता जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. 

विजयादशमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी केली नाही, परंतु शनिवारी सकाळपासून भात कापणीला चांगलीच गती आली आहे. संपूर्ण शेतीशिवारे शेतकऱ्यांनी गजबजली असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी लवकरात भात कापणी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. 


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...