रिमझिम पावसाने काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान

कमी-अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण बहुतांश भागात कायम असतानाच शनिवारी दुपारनंतर औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली.
रिमझिम पावसाने काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान Harvested by drizzle rain Crop damage
रिमझिम पावसाने काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान Harvested by drizzle rain Crop damage

औरंगाबाद :  कमी-अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण बहुतांश भागात कायम असतानाच शनिवारी दुपारनंतर औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. या पावसाने शेतात पिकाची पसर असलेल्या शेतकऱ्यांची ते झाकण्यासाठी धांदल उडाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर परिसरात शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत कायम होते. दुपारी दीड वाजता पावसाचा हलकासा शिडकावा झाला. संध्याकाळी साडेआठ वाजेदरम्यान गडगडाटासह पुन्हा पावसाच्या तुरळक सरी झाली. लोहगाव येथे हवा व पावसाचे थेंब तुटले.विजेचा कडकडाटही होता.आमठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

जायकवाडी परिसरात रिमझिम पाऊस झाला. उपळी (ता. सिल्लोड ) परिसरात रिमझिम पाऊस झाला. नागापूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विहामांडवा येथे हवा व पावसाचे थेंब तुटले. ढोरकीन येथे हलकिशी भुरभुर. वीजपुरवठा खंडित झाला. पाचोड परिसरात विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला. कडेठाण  येथे हवा व पावसाचे थेंब तुटले. बालानगरसह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

सोयगाव येथे ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस झाला. खुलताबाद येथे विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली. हतनूर (ता. कन्नड) परिसरात वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात लासूर स्टेशनला विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगावसह परिसरात शनिवारी रात्री अकरा वाजेपासून सोमवारी पहाटेपर्यंत अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांची एकच धांदल उडाली. तर उन्हाळी बाजरी उशिरा पेरलेला व काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचेही नुकसान झाले. 

गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढलेला होता शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आभाळ भरून आले, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. गाव परिसरात अनेक ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उतरलेल्या आहेत अचानक वारे पाऊस सुरु झाल्याने मजुरांनी शेतकऱ्यांचे आखाडे, गावातील शाळेच्या खोल्यात आसरा घेतला.

मात्र संसार उघड्यावरच पडून होता, धान्य कपडे भिजून गेले. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी उशिरा पेरलेला व काढायला आलेला गव्हू, हरभरा भिजला आहे तर काही ठिकाणी बाजरी, कांदा बियाणे पीक पडल्याने नुकसान झाले. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट परिसरात आज सकाळी पावसाची हजेरी लागली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com