हार्वेस्टरला मिळणार आता नोंदणी क्रमांक

Harvester got permanent number
Harvester got permanent number

नागपूर ः पंजाबातून खरेदी करून आणण्यात येणाऱ्या हार्वेस्टरच्या नोंदणीचा प्रश्‍न होता. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रश्‍न निकाली निघाला आहे. पंजाबातून खरेदी होणाऱ्या या हार्वेस्टरला पंजाब आरटीओकडून तात्पुरता नंबर, तर नागपुरात कायम नंबर मिळणार आहे. 

हार्वेस्टर मशीन या शेतकऱ्यांनी पंजाबातून घेतली. मात्र, पंजाब आरटीओ आणि हार्वेस्टर कंपनीने या शेतकऱ्यांना तात्पुरता नंबर देण्यास नकार दिला होता. तात्पुरता नंबर मिळत नाही तोवर कायम नंबर दिला जात नाही. त्यामुळे हार्वेस्टर चालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. लाखोंचे हार्वेस्टर केवळ तात्पुरता नंबर नसल्यामुळे पडून होते. या प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंजाब आरटीओ आणि संबंधित कंपन्यांशी चर्चा केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर या शेतकऱ्यांच्या हार्वेस्टरला तात्पुरता नंबर देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हार्वेस्टर चालकांची पथकर (टोल) नाक्‍यावरही लुट होत होती. काही हार्वेस्टरचालकांकडून ६०० तर काही जणांकडून ८०० रुपयांची आकारणी होत होती. हा मुद्दा देखील हार्वेस्टर चालकांनी नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिला. त्याची दखल घेत गडकरी यांनी शेतकरी मालक असलेले हार्वेस्टर टोलमुक्‍त करण्याचे आदेश दिले आहेत. हार्वेस्टर संदर्भात इतरही अनेक मुद्यांकडे नितीन गडकरी यांचे लक्ष्य वेधण्यात आले. या प्रश्‍नांच्या सोडवणुकीचे आश्‍वासन गडकरी यांनी दिले.

पोलिसांकडून होणारी लूट थांबवा राष्ट्रीय महामार्गावर हार्वेस्टर चालकांकडून पोलिसही पठाणी वसुली करतात. प्रत्येक वेळी दोन हजार रुपयांची मागणी होते. अन्यथा १५ हजार रुपयांचा दंड करण्याची भीती दाखविली जाते. या प्रकाराकडे देखील शेतकरी हार्वेस्टर मालकांनी नितीन गडकरी यांचे लक्ष्य वेधले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com