पीकविमा परतावा नाकारल्यामुळे पीककापणी प्रयोग अहवालाची प्रतीकात्मक होळी

पीकविमा परतावा नाकारल्यामुळे पीककापणी प्रयोग अहवालाची प्रतीकात्मक होळी
पीकविमा परतावा नाकारल्यामुळे पीककापणी प्रयोग अहवालाची प्रतीकात्मक होळी

नांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये २०१८-१९ च्या खरीप हंगामात दुष्काळी स्थिती असताना विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीकविमा परतावा नाकारला. त्यामुळे बुधवारी (ता. ३१) दुपारी सोनखेड (ता. लोहा) येथे शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक पीक कापणी प्रयोग अहवालाची होळी केली.

गतवर्षी (२०१८) च्या पावसाळ्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दुष्काळी स्थिती उद्भभवली होती. या परिस्थितीत पीक कापणी प्रयोगाच्याआधारे पीकविमा नुकसानभरपाई देणे कालबाह्य आहे. प्रशासानाच्या अकार्यक्षमतेमुळे दुष्काळ जाहीर करण्यास उशीर झाला. 

पीकविमा नुकसानभरपाईची अधिसूचना योग्य वेळी न काढल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेल्या पीकउत्पादनामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींची नुकसानभरपाई नाकारण्यात आली. परिणामी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे उद्योगपती आणि प्रशासनाने केलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या निषेधार्थ सोनखेड (ता. लोहा) येथील बाजार मैदानावर बुधवारी (ता. ३१) दुपारी शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांच्या नेतृत्वाखाली अहवालाची होळी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com