Agriculture news in marathi Harvesting of soybean in Khandesh, threshing on extension | Agrowon

खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा नाही. अतिपावसात पिकांची हानी झाली आहे. त्यात सोयाबीनच्या उत्पादकतेला फटका बसू शकतो. सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर पडली आहे. 

जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा नाही. अतिपावसात पिकांची हानी झाली आहे. त्यात सोयाबीनच्या उत्पादकतेला फटका बसू शकतो. सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर पडली आहे. 

कापणी, मळणी सुरू झालेली नाही. परंतु कापणी व मळणीचे दर मात्र गावोगावी जाहीर होत आहेत. मजूरटंचाई आहे. त्यातच सध्या ढगाळ वातावरण आहे. पिके घरात आणण्याची धावपळ शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. गेले २५ दिवस खानदेशात सतत पाऊस सुरू होता. पावसामुळे कापूस, ज्वारी, उडीद, मूग व सोयाबीनचेदेखील नुकसान झाले आहे. सोयाबीनला शेंगा कमी लागल्या आहेत. त्यांचा दर्जाही अतिपावसात खराब झाला आहे. पाऊस गेले तीन दिवस बंद आहे. 

सध्या पाऊस नसल्याने पुढे जमिनीत  वाफसा होईल. सोयाबीनची मळणी हार्वेस्टरने करता येते. परंतु, वाफसा नसल्याने वजनदार हार्वेस्टरची यंत्रणा शेतात काम करू शकत नाही. यामुळे मजुरांची गरज भासणार आहे. मजुरांकरवी कापणी करून शेतात ढीग करावे लागतील. यानंतर ट्रॅक्टरचलित आधुनिक मळणी यंत्राद्वारे मळणी करता येईल. यंदा कापणी व ढीग गोळा करणे व मळणीचे दर स्थिर आहेत. कापणी व शेतातच ढीग गोळा करण्यासाठी एकरी ३ हजार रुपये दर मजूर घेत आहेत. तर, मळणीसाठी प्रतिक्विंटल ५०० रुपये दर आहे. 

अतिपावसाचा मोठा फटका

सोयाबीनचे उत्पादन किती येईल, हे सध्या सांगता येणार नाही. परंतु, जेथे स्थिती बरी आहे, त्यात भागात एकरी दोन क्विंटल उत्पादन येवू शकते. काही भागात पिकाला शेंगाच लागल्या नव्हत्या. तर, अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे जूनमधील पावसाच्या खंडात नुकसान झाले होते. खानदेशात सुमारे ४० हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. यातील मोठ्या क्षेत्राला अतिपावसाचा फटका बसला. त्यामुळे पीक परवडणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

सोयाबीनचे पीक यंदा सुरवातीला पावसाचा खंड व अलीकडचा अतिपाऊस यात खराब झाले आहे. उत्पादकता कमीच राहील. मळणी व कापणीचे दर स्थिर आहेत. वाफसा काळ्या कसदार जमिनीत नाही. यामुळे कापणी व मळणीला वेळ लागू शकतो. 
- किशोर चौधरी, शेतरी, असोदा (जि.जळगाव)


इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...